
प्रशांत ननावरे
nanawareprashant@gmail.com
पुरुषांच्या बरोबरीने अर्थार्जन करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या स्त्रीच्या खांद्यावरील जेवण बनवण्याची मूलभूत जबाबदारी कोण पार पाडणार, या प्रश्नाला नाक्यानाक्यावरील पोळी-भाजी केंद्रांनी मदतीचा हात दिलाय. महिलांमार्फतच चालवल्या जाणाऱ्या या केंद्रांवर घरगुती पद्धतीचे जेवण मिळत असल्याने नोकरदार महिला आणि पुरुषांनी सुटकेचा निश्वास टाकल्याचं दिसतं. बाहेरचं खाल्ल्याने होणाऱ्या पोटाच्या तक्रारींना यानिमित्ताने आळा तर बसलाच शिवाय, अतिशय माफक दरात गरमागरम नाष्टा आणि जेवण मिळत असल्याने ‘आज जेवायला काय?’ हा वैश्विक प्रश्न एका झटक्यात सोडवला आहे. चूल आणि मूल यामध्ये अडकून पडलेली स्त्री गेल्या शतकात मुक्त झाली.