

Contemporary Indian Artist
esakal
हर्ष भटकळ - saptrang@esakal.com
जीजी स्कारिया यांच्या कलाकृती आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्या आहेत. केरळमध्ये जन्म घेतलेल्या स्कारिया यांनी गुजरात व दिल्ली या राज्यातही काम केले आहे. शालेय पुस्तकांसाठी चित्रे तयार करण्याचेही काम त्यांनी केले. सामाजिक उतरंडीबद्दल जागरूक असलेल्या या कलावंताने वेगळ्या स्वरूपाच्या मुलाखती घेऊन त्यातून चित्रे साकारली.
जीजी स्कारिया यांच्या कौटुंबिक घरामागे अजूनही आगगाडीचे रूळ आहेत. ‘आमच्या घरामागे रेल्वेचे रूळ आहेत. दोन्ही बाजूंना रस्ते आहेत आणि समोरच दुकाने आहेत. ते एक जंक्शन आहे,’ असे जीजी सांगतात. ज्या कलावंताने सतत स्थलांतर, स्थित्यंतर आणि निरनिराळ्या परिस्थितीतून जाण्याच्या अनुभवाबद्दलचे विचार मांडले आहेत, त्यांच्याशी हे चित्र जुळते. जीजी स्कारिया कोथनाल्लूर ह्या एका कोट्टायम जवळच्या खेड्यात वाढले. येथील बहुतेक वस्ती ही ख्रिश्चन लोकांची होती. बालपणापासून चर्च, देऊळ आणि धार्मिक कर्मकांड आणि इतिहासातील कथा यांच्या भोवती फेर धरून होत्या. तरुण स्कारिया याला मात्र यामागील धर्म कल्पनेपेक्षा अधिक रस होता प्रतिमांचा.
‘येशू ख्रिस्ताने क्रुसावर चढणे हे मला सतत दिसायचे, येशूचे पिळदार शरीर, त्याची बांधणी, त्याचे स्नायू आणि शिल्पात ते जसे दिसायचे तसे.’
ते घरी आले की जवळच्या शेतातील माती गोळा करून मातीच्या आकृती तयार करायचे. त्यांच्या घरी कोणालाही कलेची पार्श्वभूमी नव्हती. त्यांचे वडील व्यवसाय करण्याची अयशस्वी धडपड करत असत. संसारात स्थिरता नव्हती तरी त्यांना आजी उत्तेजन देत असे. त्याचे मन रिजवायला त्या स्वतः काही आकृत्या तयार करत असत.