
- केदार गोरे, gore.kedar@gmail.com
गीरच्या राष्ट्रीय उद्यानात शिरल्यावर जंगलाच्या राजाला पाहण्याचे वेध लागले होते. तासभर फिरल्यावर काही गाड्या थांबलेल्या दिसल्या. आम्ही सज्ज झालो. गाड्यांपाशी पोहोचताच दोन तरुण ‘राजकुमार’ एका पाणवठ्यावर बसलेले दिसले. पर्यटकांनी शांतता राखल्याने ते सिंह मिटक्या मारत पाणी पिताना होणारा आवाजही आम्हाला ऐकू येत होता. त्यांचे ते राजबिंडे रूप डोळ्यापुढून जातच नव्हते...