Pandharpur Pilgrimage
esakal
लंडन ते पंढरपूर केवळ हजारो किलोमीटरची यात्रा नसून, ती महाराष्ट्रातील संतपरंपरेचा जागतिक सोहळा आहे. विठ्ठलभक्तीची पताका सातासमुद्रापार फडकवणारी ही ‘ग्लोबल वारी’ जगभरातील भक्तांना एकत्र आणणारे प्रेरणास्थान ठरेल. वारकरी संप्रदायाच्या विश्वात्मकता आणि भारतीय संस्कृतीच्या सर्वसमावेशकतेचा संदेश देणारी ही वारी आधुनिक काळातील ‘विश्वात्मक सोहळा’ ठरत आहे. हेच या ऐतिहासिक ‘ग्लोबल वारी’चे सर्वांत मोठे यश म्हणावे लागेल.

पंढरीची आषाढी वारी ही एक महाराष्ट्रातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. वारी म्हणजे संतांसमवेत संतांच्या तीर्थक्षेत्राहून पायी चालत जाऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा. ‘वारी करणारा तो वारकरी’ अशी वारी आणि वारकरी यांची व्याख्या सांगितली जाते.