
ओंकार वर्तले - ovartale@gmail.com
छायाचित्रकार, प्रतिभावंत लेखक, दुर्गप्रेमी असलेले गोपाळ नीळकंठ दांडेकर अर्थात गोनीदां म्हणजे मराठी साहित्य विश्वाला मिळालेली एक अपूर्व देणगी. कुमार साहित्य, ललितगद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक, पौराणिक अशा विविध प्रकारच्या साहित्य लेखनात त्यांचे योगदान अमूल्य आहे. अशा दुर्गप्रेमी ‘गोनीदां’चे घर मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे आहे, त्याविषयी...