Good Will Hunting : ‘गुडविल हंटिंग’मध्ये युवकाच्या संघर्षाची आणि स्वप्नांची कथा कशी उलगडते?

Coming of Age Movie : ‘गुडविल हंटिंग’ हा युवकाच्या वयात येण्याचा प्रवास, गणिती कौशल्य, करिअरची इच्छा आणि योग्य मार्गदर्शकाच्या शोधाची कथा सांगणारा ‘कमिंग ऑफ एज’ चित्रपट आहे.
Coming of Age Movie

Coming of Age Movie

esakal

Updated on

सुहास किर्लोस्कर - suhass.kirloskar@gmail.com

चित्रपटाचे अनेक प्रकार असतात. काही प्रकार त्या विषयाच्या हाताळणीवर ठरतात तर काही प्रकार त्या विषयावर ठरतात. उदाहरणार्थ, नर्मविनोदी शैलीमध्ये एखादी प्रेमकथा दाखवली असल्यास त्याचे वर्गीकरण ‘रॉम कॉम’मध्ये (रोमँटिक कॉमेडी) होते. मुलांचे वयात येणे आणि युवकापासून प्रौढ व्यक्तीमध्ये रूपांतर होतानाचा प्रवास दाखवणाऱ्या चित्रपटांना ‘कमिंग ऑफ एज’ म्हणतात. या वयामध्ये शाळेतून कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला असतो, शाळेतल्या जोखडापासून मुक्तता मिळालेली असते. त्यामुळे कॉलेजमध्ये काही लेक्चर्स बुडवणे, मित्रांच्या घोळक्यात टाइमपास करणे, अरेला कारे करणे, घरात/घराबाहेर कोणी दमदाटी केल्यास त्याला तोडीस तोड उत्तरे देणे, वाद घालणे, बंड करणे, प्रेमात पडणे, चेष्टामस्करी करणे, आपल्या भविष्याची चिंता करणे, त्यासाठी आपली खरी आवड ओळखणे, अशी अनेक स्थित्यंतरे येत असतात. सगळीकडून हेटाळणी होत असताना कोणी आपले ऐकून घेणारा भेटला, तर त्याच्याकडून मार्गदर्शन घेण्याची त्यांची तयारी असते, परंतु तो मार्गदर्शक कसा असावा, याचीच गोष्ट चित्रपटाच्या दृश्य माध्यमातून सांगणारा उत्तम चित्रपट म्हणजे ‘गुडविल हंटिंग’, जो घरातल्या सर्वांनीच युवा वर्गाबरोबर बघावा.

डिस्ने हॉट स्टारवर अलीकडेच उपलब्ध झालेल्या या चित्रपटाच्या नावात शाब्दिक कोटी आहे (pun intended). विल हंटिंग हे नायकाचे नाव आहे. त्याला चांगले बनायचे आहे पण अर्थार्जनासाठी तो एमआयटीमध्ये स्वच्छता करणाऱ्याचे काम करतो. आयुष्यात त्यालाही संस्मरणीय काही करण्याची, उत्तम शिक्षण घेण्याची, करियर करण्याची इच्छा आहे परंतु त्याच्या गणिती कौशल्याच्या आड त्याची परिस्थिती येते. हंटिंग हा शब्दप्रयोग जॉब हंटिंग या अर्थानेही वापरला जातो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com