
ऋषिराज तायडे - rushirajtayde@gmail.com
नुकत्याच पार पडलेल्या ‘गुगल आय/ओ २०२५’ परिषदेत गुगलने कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित अनेक नवनवीन संकल्पना सादर केल्या. ‘जेमिनी’ या गुगलच्या लोकप्रिय एआय असिस्टंटची नवी आणि अद्ययावत आवृत्ती ‘जेमिनी २.५’मुळे वापरकर्त्यांना मजकूर, फोटो, ऑडिओ आणि व्हिडिओच्या मदतीने हवी ती माहिती गुगलला विचारता येते. त्यामुळे आता गुगल सर्च करणे अधिक सोयीस्कर आणि मजेशीर होणार आहे.