Gulabs Machinesakal
सप्तरंग
मन साफ करणारी मशिन
‘गुलाब आणि तिचं मशीन’ या पुस्तकात सागर कोळवणकर यांनी एका मुलीच्या प्रेरणादायी प्रयत्नांची कथा मांडली आहे, जी आपल्या कुटुंबाच्या अडचणी आणि समाजातील गटार साफ करण्याच्या कुटुंबाच्या कामाचे महत्त्व समजून एक यांत्रिक समाधान तयार करते.
गौरी देशपांडे-gaurisdeshpande1294@gmail.com
दुसऱ्या दिवशी शाळेतून आल्यावर गुलाब आपल्या मशिनवर काम करत बसली. रात्री तिने मशिन गोणीने झाकून ठेवली आणि त्याजवळच ती झोपली. ओह! सांगायचं राहिलंच - गुलाबाच्या शाळेत असणार होता विज्ञान दिन आणि त्यासाठी ती मशिन तयार करत होती. नेमकं काय तयार करत होती कोणास ठाऊक! खरं तर, त्या दिवशी राजू आणि समीरशी झालेली वादावादी काही केल्या तिच्या डोक्यातून जात नव्हती.

