
प्रशांत ननावरे - nanawareprashant@gmail.com
मुंबई शहरातील गिरगाव आणि मराठी माणूस हे एकमेकांना समानअर्थी शब्द शोभावे इतके जवळचे होते. काळ पुढे सरकला, मुंबई शहराने कात टाकली आणि मेट्रो शहर म्हणून बिरूद मिरवायला लागल्यानंतर गिरगाव आणि मराठी माणूस या नात्यामध्ये थोडी दरी निर्माण होत गेली. असं असतानाही दोघांना एकमेकांप्रती असलेला जिव्हाळा मात्र आजही कायम आहे. कारण त्यांच्या प्रेमाची साक्ष असलेल्या काही वास्तू, जागा आजही त्यांचे अस्तित्व टिकवून आहेत.