Hachi A Dogs Tale : जीव लावणाऱ्या प्रत्येकासाठी...

True story movies : ‘हाची’ आणि प्रोफेसरच्या नात्याभोवती केंद्रित असलेला ‘हाची : अ डॉग्ज टेल’ हा चित्रपट निष्ठा, प्रेम आणि संयम यांचा हृद्य अनुभव देतो.
Hachi A Dogs Tale

Hachi A Dogs Tale

esakal

Updated on

सुहास किर्लोस्कर

‘हाची’ आणि प्रोफेसर यांच्यावरचा फोकस असलेला चित्रपट इतरत्र कुठेही भटकू दिलेला नाही, हे पटकथा लेखक आणि दिग्दर्शकाचे कौशल्य आहे. एडिटर क्रिस्टिना बोडेन यांनी प्रोफेसरच्या पत्नीचे, कन्या आणि जावयाचे प्रसंग सविस्तर न दाखवता एकेक मिनिटाचे दाखवल्यामुळे चित्रपट पकड सोडत नाही.

दर्जेदार चित्रपटाचे गमक सशक्त पटकथेमध्ये असते. उत्तम पटकथेचे एक लक्षण म्हणजे त्यामध्ये ठरावीक अंतराने काहीतरी घडत असते, ‘कहानी मे ट्विस्ट’ असतो. सगळं काही सुरळीतपणे सुरू असताना काही प्रसंगामध्ये कोणीतरी विरोध करते, तो विरोध मोडून काढेपर्यंत अकस्मात काही घटना घडते, जी कथेला वेगळ्या वळणावर घेऊन जाते. ‘हाची ः अ डॉग्ज टेल’ या चित्रपटाच्या पटकथमध्ये असे ट्विस्ट आहेत, त्यामुळे ‘हाची’ या पाळीव कुत्र्याची गोष्ट बघता बघता आपण गुंतून जातो आणि एका बैठकीत चित्रपट बघितला जातो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com