चेअरमन साहेब, हा रमत-गमत जगणाऱ्या लोकांचा देश आहे. ह्यांचे देवही नृत्य करतात, पावा वाजवतात. ह्यांना लग्नाला जायचंय, दहाव्याला जायचंय, होळी, दांडिया खेळायचाय आणि हे सगळं करत असताना एक दर्जेदार उदरनिर्वाह देखील चालवायचा आहे. ह्या सगळ्याची लय शतकानुशतके ह्या देशानं सांभाळली आहे. दर्जा, सातत्य ह्यातल्या काही चुका केल्या असतील, तर त्याही सुधारण्याची काहीतरी भारतीय पद्धत शोधून काढता येईलच की. पण इथल्या निमगोऱ्या जीवनपद्धतीला तुमचे गोरे पर्याय वापरायला जाऊ नका.