Premium|Ravinder Reddy Sculptures : मातीशी जडलेले नाते; आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिल्पकार रवींद्र रेड्डी यांचा प्रेरणादायी कलाप्रवास!

Contemporary Indian Sculpture Art : प्रख्यात प्रकाशक हर्ष भटकळ यांनी 'रंगरेषा' सदरातून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिल्पकार रवींद्र रेड्डी यांच्या कलासाधनेचा आणि त्यांच्या तेजस्वी स्त्री-शिल्पांचा वेध घेतला आहे.
Ravinder Reddy Sculptures

Ravinder Reddy Sculptures

esakal

Updated on

हर्ष भटकळ - saptrang@esakal.com

भटकळ कुटुंब आणि शंभर वर्षांची परंपरा असलेले ‘पॉप्युलर प्रकाशन’ साहित्यप्रेमींना नवीन नाही. हर्ष भटकळ हे त्या परंपरेतील खंदे नाव. पण हर्ष हे केवळ एक अनुभवी प्रकाशकच नव्हेत, तर कलांचा खुल्या मनाने आस्वाद घेणारा अतिशय संवेदनशील रसिक त्यांच्यात आहे. त्यातही चित्रकला आणि शिल्पकलेचा रसास्वाद त्यांच्या विशेष आवडीचा. सर्वसामान्यांपैकी अनेकांच्या रूढ परीघापासून दूर राहणाऱ्या या कलाक्षेत्रांतील थोरांची, राज्योराज्यीच्या कलावंतांची ओळख हर्ष भटकळ करून देताहेत ‘रंगरेषा’ या सदरातून.

कला माणसाला घडवते, त्याला स्फूर्ती देते, जीवनाला दिशा दाखवते. ती अस्वस्थतेला वाट करून देते आणि संस्कृतीशी नातेही घट्ट करते. मात्र सर्वसामान्यांमध्ये ती बंदिस्त वस्तुसंग्रहालयात किंवा केवळ उच्चभ्रूंसाठी असलेल्या आर्ट गॅलरीत दिसते. खरी गोष्ट अशी आहे की, कला यापेक्षा कितीतरी अधिक व्यापक आहे. कलाकाराला आपल्या मनातील भावना आणि विचार मांडायचे असतात. या सगळ्यांत प्रगल्भतेने सहभागी होणारा एक कलावंत म्हणजे विशाखापट्टणमचा शिल्पकार रवींद्र रेड्डी.

रेड्डी हे त्यांच्या तेजस्वी, रंगीत आणि लक्षणीय स्त्री शिल्पांसाठी ओळखले जातात. भारतीय शिल्पकलेच्या इतिहासात त्यांनी एक नवे पर्व लिहिले आहे. पण त्यांच्या या यशामागे आहे एक प्रदीर्घ तपश्चर्या, स्वतःचा शोध आणि आपल्याकडील परंपरांविषयी प्रामाणिक आस्था. रेड्डी यांच्या सुरुवातीच्या संघर्षांपासून ते आजपर्यंतचा प्रवास त्यांच्याशी बोलताना उलगडत गेला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com