New Marathi Book : निसर्ग आणि मानवी भावनांची अनोखी गुंफण

Stories Rooted in Nature : ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून निसर्ग, कल्पनाशक्ती, विज्ञान आणि मानवी संवेदनांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो. प्रत्येक कथा मुलांसह प्रौढांनाही माणुसकीचा आणि निसर्गाचा नवा अर्थ शिकवते.
New Marathi Book

New Marathi Book

esakal

Updated on

सलील तांबे - saptarang@esakal.com

हाटूमुटूचा चंद्र’ हे पुस्तक म्हणजे निसर्ग आणि मानवी भावनांची एक अनोखी गुंफण आहे. जिथे माती स्वप्न पाहते, सायकलला मन असतं आणि मुक्या प्राण्यांनाही माणसांची ओढ लागते. या अद्भुत जगात लेखक फारूक काझी आपल्याला घेऊन जातात.

या पुस्तकात एकूण दहा कथा आहेत. या कथा मुलांचे केवळ मनोरंजन करत नाहीत, तर मोठ्यांनाही आपल्या सभोवतालच्या निसर्गाशी आणि हरवलेल्या माणुसकीशी नव्याने जोडतात. यात गावाकडच्या मातीचा सुगंध आहे, तसाच अंतराळात घडणाऱ्या रंजक विज्ञानाचा थरारही अनुभवता येतो. लेखक या कथांतून आपल्याला अशा एका प्रदेशात घेऊन जातात, जिथे मुकी जनावरे माणसांना माया लावतात आणि मुले आपल्या साध्या वाटणाऱ्या कृतीतून जग बदलण्याचे मोठे धडे देऊन जातात. आजच्या धावपळीच्या युगात आपण निसर्गापासून दूर जात असताना, हे पुस्तक सर्व वयोगटांतील वाचकांना पुन्हा एकदा आपल्या मुळांशी जोडण्याचे काम करते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com