Hindi Movie Review : एका स्त्रीचा कॅमेऱ्यातून स्वशोध

Women Police Officer : प्राइमवर प्रदर्शित हिंदी चित्रपटात महिला पोलिस अधिकाऱ्याच्या माध्यमातून खुनाच्या तपासापलीकडील पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्था, सासरच्या घरातील दुय्यम वागणूक आणि पोलिस यंत्रणेतील वास्तवावर भाष्य केले आहे.
Hindi Movie Review

Hindi Movie Review

esakal

Updated on

सुहास किर्लोस्कर

प्राइमवर रिलीज झालेल्या या हिंदी चित्रपटात बबिता सिंग ही नायिका पोलिस सुपरिटेंडंट आहे आणि तिच्या सासरच्या गावात एक खून झालेला असल्यास त्याचा तपास ती करणार, हे उघड आहे. परंतु हा चित्रपट खुनाच्या तपासाबद्दल नाही. चित्रपट कथेचा विषय तो असला तरी चित्रपट भाष्य करतो एकूण समाज व्यवस्थेवर, पुरुषप्रधान कुटुंब व्यवस्थेवर आणि एकूणच सासरकडच्या मंडळीकडून वधूला मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीबद्दल.

पोलिस खात्यात सुपरिटेंडंटचे काम करणारी नायिका बेबी (निमिषा) तिच्या साहेबाचे रीळ बनवत आहे, तिचा साहेब बाइकवरून थाटात येतो आणि ती मोबाइल शूटिंग बंद करते. ‘‘सेकंड टेक हमेशा बेटर होता है सर” असे ती म्हणते याचा अर्थ तिने यात बराच वेळ घालवला आहे. तरीही तिचा साहेब सब-इन्स्पेक्टर सेठी (राजेश कुमार) त्यावर खूश होतो. तत्परतेने ती विचारते, “सर, मेरे लिव्ह अप्लिकेशन का देखो ना...” दोन मिनिटांच्या या प्रसंगात पोलिस कारभार कसा चालतो, याचे प्रत्यंतर येते. पोलिसांना रजा मिळवण्यासाठी साहेबांची हांजी हांजी करावी लागते. नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस खात्यात सर्वांना समान न्याय नाही आणि अथकपणे काम करावे लागते, परंतु त्याचा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाशी फारसा संबंध नाही, हे दृश्य पटकथा लेखन आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून किती प्रभावीपणे दाखवता येते, याचे उत्तम उदाहरण आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com