

painting
esakal
कलाकार लक्षात येतात. तर काहींचा कलाप्रवास, जीवनानुभव त्यांच्या स्टुडिओच्या कामातूनच सहजतेने दिसू लागतो. अहमदाबाद येथे १९३९ मध्ये जन्मलेल्या मनू पारेख यांचे जीवन आणि कार्य असेच सातत्यपूर्ण कामातून उभे राहिलेले...
म नू पारेख पेंटर तर आहेतच, पण त्यांनी रंगमंचासंबंधी सांस्कृतिक क्षेत्रात आणि तरुण कलाकारांना उत्तेजन देणारे विचारवंत म्हणून केलेले काम तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांनी सहा दशकांहून अधिक काळ जीवन आणि कला, सौंदर्यशास्त्र आणि नैतिक मूल्ये या क्षेत्रांत संचार केला आहे. कल्पनाशक्ती आणि जबाबदारी या दोहोंचा सांभाळ करणारा हा कलाकार आहे.