History Books : शिवरायांच्या चित्रांचा जागतिक वेध; प्रसाद तारे यांचे संशोधन

History of Chhatrapati Shivaji Maharaj in Foreign Archives : परकीय शत्रूंच्या नजरेतील 'अजेय' शिवराय! प्रसाद तारे यांच्या संशोधनातून लंडन गॅझेटमधील बातम्या, जगभरातील दुर्मिळ चित्रे आणि विदेशी राजदूतांनी घेतलेली महाराजांची प्रेरणा अशा ऐतिहासिक पैलूंचा वेध घेण्यात आला आहे.
History of Chhatrapati Shivaji Maharaj in Foreign Archives

History of Chhatrapati Shivaji Maharaj in Foreign Archives

sakal

Updated on

विनायक लिमये - vinayak.limaye@esakal.com

छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू समजून घेण्यासाठी अनेक लेखक, कादंबरीकार सतत प्रयत्न करत असतात. त्याचप्रमाणे इतिहास संशोधक प्रसाद तारे यांनीही प्रेरणा घेऊन महाराजांची जगभर असलेली चित्रे व अन्य तपशील हा अभ्यासाचा विषय मानला व संशोधन केले. शिवरायांच्या कर्तृत्वाची ओळख सांगणारी सात पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यातील तीन पुस्तकांचा वेध घेताना आपल्या लक्षात येतात ते त्यांचे परिश्रम व निष्ठा. भारतभर प्रवास करून चित्रे, शिल्पे याचा वेध त्यांनी घेतला. परदेशातील संग्रहालयांना भेट देऊन शिवरायांची त्या काळात काढलेली चित्रे विविध परवानग्या आणि रॉयल्टीपोटी मोठी रक्कम मोजून मिळवली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com