Marathi Books: इतिहास, कविता, धर्म आणि काश्मीर सफर; चार नवी पुस्तके.. वाचनविश्वात नव्या पानांची भर

Marathi Literature: संभाजीराजांच्या पराक्रमापासून आत्मस्पंदनातील कवितांपर्यंत, धर्मविचारांच्या चित्रमय मांडणीपासून काश्मीर खोऱ्यातील तरुणीच्या अनुभवांपर्यंत..
marathi books

marathi books

Esakal

Updated on

छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांच्या व्यक्तिमत्त्वाचं चित्रण राजेंद्र घाडगे यांनी ‘शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे’ या त्यांच्या पुस्तकात केले आहे. एकूण १४ प्रकरणांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. भोसले घराण्याची पूर्वपीठिका ह्या प्रकरणापासून पुस्तकाची सुरुवात होते. शहाजीराजे, जिजाबाई यांच्यावर स्वतंत्र लेखन करण्यात आले आहे. संभाजीराजांची युद्धनीती व रणनीती दाखवणारे विविध प्रसंग समर्पक शब्दांत मांडण्यात आले आहेत. संभाजीराजांच्या कर्नाटक मोहिमेचाही पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. ‘संभाजीराजांचा भीमपराक्रम व दुर्दैवी अंत’ ही दोन प्रकरणे हृदयस्पर्शी आहेत.

वैशिष्ट्य : साध्या-सोप्या शब्दांत मांडणी व उपयुक्त संदर्भसूची.

प्रकाशक : लोकायत प्रकाशन, सातारा

पृष्ठे : ८४,  मूल्य : १२० रु.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com