

Homeschooling in India
esakal
गणाधीश प्रभुदेसाई - ganadhish.prabhudesai@esakal.com
पारंपरिक शालेय शिक्षणपद्धतीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची आज गरज निर्माण झाली आहे. घरातून शिक्षण घेण्याची संकल्पना, तिच्यामागील विचार आणि मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेतील बदलते आयाम याकडेही लक्ष देण्याची वेळ आली आहे. आणि नेमके हेच काम एका पुस्तकाने केले आहे. रेणू दांडेकर लिखित ‘होम स्कूलिंग : शिक्षणाच्या नव्या वाटा समजून घेताना...’ हे पुस्तक या मुद्द्यांचा वेध घेते.
‘‘जेवढे प्रश्न जास्त पडतील तेवढी उत्तरे शोधली जातील आणि उत्तरातून दिशाही. नवीन गोष्ट समजून घेताना पाटी कोरी असू द्या. आधीचा मनातला आशय घेऊन, म्हणजे पूर्वग्रहाने नव्या गोष्टीकडे बघू नये. नाहीतर आपलं मन वेगळं होऊ शकतं. म्हणून या विषयाकडे साशंक मन घेऊन नको पाहायला,’’ असा सल्ला लेखिकेने पहिल्याच धड्यात दिलेला आहे. हे लक्षात ठेवूनच पुस्तक वाचणं परिणामकारक ठरेल.