esakal | जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 18 फेब्रुवारी

बोलून बातमी शोधा

horoscope for 18 February

आजचे दिनमान

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 18 फेब्रुवारी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आजचे दिनमान 

मेष : मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहील. मानसिक चिंता कमी होतील. गेले दोन दिवस रखडलेली कामे मार्गी लावू शकणार आहात. प्रवासास अनुकूलता लाभेल. 

वृषभ : जिद्दीने कार्यरत रहावे लागणार आहे. वाहने सावकाश चालवावीत. एखादी मनाविरुद्ध घटना संभवते. महत्त्वाची कामे आज नकोत. प्रवासामध्ये अडचणी जाणवण्याची शक्‍यता आहे. 

मिथुन : चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामे यशस्वी कराल. आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. उत्साही राहणार आहात. 

कर्क : प्रवासात काळजी हवी. वाहने सावकाश चालवावीत. एखादी मनस्तापदायक घटना संभवते. खर्च वाढणार आहेत. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. मनोबल कमी राहील. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सिंह : महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. व्यवसायामध्ये तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. आर्थिक कामे मार्गी लावू शकाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. चिकाटी वाढेल. विविध लाभ होतील. 

कन्या : आजचा दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहे. मनोबल उत्तम राहणार आहे. चिकाटी वाढणार आहे. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाच्या कामात अनुकूलता लाभणार आहे. 

तुळ : प्रवासाचे योग येतील. जिद्दीने कार्यरत राहून मनोबल वाढेल. आत्मविश्‍वासपूर्वक निर्णय घ्याल. अपेक्षित सुसंधी लाभणार आहे. नातेवाईकांच्या अपेक्षित गाठीभेटी पडतील. 

वृश्‍चिक : आर्थिक लाभ होणार आहेत. कुटुंबात सुसंवाद राहील. स्वास्थ्य लाभणार आहे. काहींना गुप्त वार्ता समजतील. प्रवास सुखकर होतील. काहींना अचानक धनलाभ संभवतो. 

धनु : आरोग्य उत्तम राहणार आहे. मानसिक अस्वस्थता संपेल. महत्त्वाची तसेच दैनंदिन कामे पूर्ण होणार आहेत. तुमचे मन आशावादी राहील. सकारात्मकपणे विचार कराल. 

मकर : काहींना नैराश्‍य जाणवण्याची शक्‍यता आहे. कामे नकोशी होतील. आजचा दिवस कंटाळवाणा जाण्याची शक्‍यता आहे. मनोबल कमी असणार आहे. प्रकृतीच्या तक्रारी राहतील. 

कुंभ : मनोबल वाढेल. विविध लाभ होतील. वरिष्ठांचे तसेच नोकरीतील सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. चिकाटी वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. 

मीन : सर्वत्र तुमचा दबदबा राहील. सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान लाभेल. उत्साहाने कार्यरत राहून दैनंदिन कामे यशस्वी कराल. प्रवास होणार आहेत. चिकाटीने कार्यरत राहून सुयश मिळवाल.