esakal | जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 1 एप्रिल
sakal

बोलून बातमी शोधा

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 1 एप्रिल

आजचे पंचांग
बुधवार : चैत्र शुद्ध 8, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.32, सूर्यास्त 6.48, चंद्रोदय सकाळी 11.09, चंद्रास्त रात्री 12, भारतीय सौर चैत्र 12, शके 1942

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 1 एप्रिल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

1 एप्रिल 2020 : बुधवार 
आजचे दिनमान 

मेष : आत्मविश्‍वासपूर्वक कार्यरत राहाल. चिकाटी वाढणार आहे. नातेवाइकांच्या अनपेक्षितपणे गाठीभेटी पडतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. 

वृषभ : मनोबल उत्तम राहील. काहींना अचानक धनलाभ संभवतो. आर्थिक कामांसाठी अनुकूलता लाभणार आहे. नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील. प्रवासाचे योग येणार आहेत. 

मिथुन : उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहणार आहात. अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. चिकाटी वाढणार आहे. स्वास्थ्य व समाधान लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. 

कर्क : अस्वस्थता राहणार आहे. काहींचा आराम करण्याकडे कल राहील. मनोरंजन व करमणुकीवर खर्च कराल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. वाहने सावकाश चालवावीत. 

सिंह : मनोबल उत्तम असणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रवासाचे योग येतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक अस्वस्थता कमी होणार आहे. काहींचे बौद्धिक परिवर्तन होईल. 

कन्या : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम असणार आहे. चिकाटी वाढणार आहे. कामाचा ताण कमी असणार आहे. 

तूळ : चिकाटीने कार्यरत राहू शकणार आहात. दैनंदिन कामे मार्गी लावणार आहात. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो. 

वृश्‍चिक : मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागेल. प्रवास शक्‍यतो टाळावेत. मनोबल कमी राहील. अस्वस्थता राहणार आहे. कामाचा ताण व दगदग राहील. कौटुंबिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. 

धनू : प्रवासाचे योग येतील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. तुमचे मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. चिकाटी वाढणार आहे. स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. 

मकर : विरोधकांवर मात कराल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या संदर्भात काहींना त्रास संभवतो. वाहने सावकाश चालवावीत. अनावश्‍यक कामे करावी लागतील. 

कुंभ : प्रियजन भेटणार आहेत. एखाद्या बाबतीत सौख्य व समाधान लाभेल. मनोबल उत्तम असणार आहे. चिकाटीने कार्यरत राहू शकणार आहात. प्रवासाचे योग येतील. 

मीन : प्रसन्नता लाभेल. कामाचा ताण कमी होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रात तुमची प्रगती होईल. प्रतिष्ठा वाढणार आहे. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. 

आजचे पंचांग
बुधवार : चैत्र शुद्ध 8, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.32, सूर्यास्त 6.48, चंद्रोदय सकाळी 11.09, चंद्रास्त रात्री 12, भारतीय सौर चैत्र 12, शके 1942

loading image