जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 10 जानेवारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

पंचांग 10 जानेवारी 2020 
शुक्रवार : पौष शुद्ध 15, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.12, सूर्यास्त 6.11, चंद्रोदय सायंकाळी 5.50, चंद्रास्त सकाळी 6.36, शाकंभरीदेवी नवरात्र समाप्ती, शाकंभरी पौर्णिमा, भारतीय सौर पौष 20, शके 1941. 

दिनमान 10 जानेवारी 2020 

मेष : शुभ कामासाठी दिवस प्रतिकूल आहे. चांगली संधी व प्रसिद्धी लाभेल. हाती घेतलेल्या कामात यश लाभणार आहे. 

वृषभ : प्रवास शक्‍यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. आर्थिक कामे समाधानकारक होतील. 

मिथुन : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. विशेष यश लाभणार आहे. तुमच्या आशाआकांक्षा सफल होणार आहेत. 

कर्क : कामामध्ये अडचणी येणार आहेत. मन अप्रसन्न राहणार आहे. कोणतीही महत्त्वाची गोष्ट नको. 

सिंह : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभणार आहे. 

कन्या : आर्थिक क्षेत्रात अडचणी येणार आहेत. व्यवसायात धाडस टाळावे. वैवाहिक जीवनात असमाधानकारक वातावरण राहील. 

तूळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. सर्व क्षेत्रात यश लाभणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. 

वृश्‍चिक : प्रवास शक्‍यतो पुढे ढकलावेत. आपणाला शंभर टक्‍के यश मिळणार आहे हे गृहीत धरू नका. कामे ऐनवेळी पुढे ढकलली जाणार आहेत. 

धनू : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. साडेसातीची तीव्रता कमी होणार आहे. तुमचा सध्याचा दृष्टिकोन बरोबर आहे. 

मकर : व्यवहारात आपण फसणार नाही याची दक्षता घ्यावी. भागीदारी व्यवसायात कटकटी वाढणार आहेत. विशेष आर्थिक लाभ होतील. 

कुंभ : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडणार आहे. 

मीन : आर्थिक क्षेत्रात लाभदायक स्थिती राहील. व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. मुलामुलींच्याकरिता जादा खर्च करावा लागेल. 

पंचांग 10 जानेवारी 2020 
शुक्रवार : पौष शुद्ध 15, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.12, सूर्यास्त 6.11, चंद्रोदय सायंकाळी 5.50, चंद्रास्त सकाळी 6.36, शाकंभरीदेवी नवरात्र समाप्ती, शाकंभरी पौर्णिमा, भारतीय सौर पौष 20, शके 1941. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 10 January 2020