जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 11 फेब्रुवारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

पंचांग 11 फेब्रुवारी 2020 
मंगळवार : माघ कृष्ण 3, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय 7.07, सूर्यास्त 6.33, चंद्रोदय रात्री 8.48, चंद्रास्त सकाळी 8.49, भारतीय सौर माघ 22, शके 1941. 

दिनमान 11 फेब्रुवारी 2020 

मेष : काहींना विविध लाभ होणार आहेत. मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष द्या. आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे. 

वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे पूर्ण करू शकणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. 

मिथुन : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढणार आहे. आत्मविश्‍वासपूर्वक कार्यरत राहणार आहात. 

कर्क : आनंददायी वातावरण राहणार आहे. व्यवसायातील आर्थिक कामे यशस्वी होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. 

सिंह : आरोग्य उत्तम राहणार आहे. वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. 

कन्या : काहींना निरुत्साह जाणवणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास कमी राहणार आहे. कामाचा ताण व दगदग जाणवेल. 

तूळ : प्रियजनांचा सहवास लाभणार आहे. मन अत्यंत आनंदी राहणार आहे. आर्थिक कामे मार्गी लावू शकणार आहात. 

वृश्‍चिक : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आरोग्य उत्तम राहणार आहे. अनेक कामे मार्गी लावू शकणार आहात. 

धनू : मनोबल उत्तम राहणार आहे. चिकाटीने कार्यरत राहू शकणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. 

मकर : प्रवास शक्‍यतो टाळावेत. वाहने चालवताना दक्षता हवी. एखाद्या मनस्तापदायक घटनेला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. 

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाच्या कामात दिवस विशेष अनुकूल आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. 

मीन : आर्थिक कामास दिवस अनुकूल नाही. दैनंदिन आर्थिक कामे जपून करावीत. वाहने चालवताना विशेष दक्षता घ्यावी. 

पंचांग 11 फेब्रुवारी 2020 
मंगळवार : माघ कृष्ण 3, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय 7.07, सूर्यास्त 6.33, चंद्रोदय रात्री 8.48, चंद्रास्त सकाळी 8.49, भारतीय सौर माघ 22, शके 1941. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 11 February 2020