जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 11 जुलै

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

मेष : धार्मिक कार्याकडे ओढा राहील. प्रॉपर्टीच्या, जमिनीच्या, खरेदीच्या प्रश्‍नात यश मिळेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही. 

वृषभ : काहींना नातेवाइकांकरिता खर्च करावा लागेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. काही निर्णय धाडसाने घ्याल. 

आजचे दिनमान 
मेष : धार्मिक कार्याकडे ओढा राहील. प्रॉपर्टीच्या, जमिनीच्या, खरेदीच्या प्रश्‍नात यश मिळेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही. 

वृषभ : काहींना नातेवाइकांकरिता खर्च करावा लागेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. काही निर्णय धाडसाने घ्याल. 

मिथुन : नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. उद्योग, व्यवसायात वेगाने प्रगती करू शकाल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. 

कर्क : कामाचा ताण व दगदग वाढणार आहे. मात्र हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रसिद्धी लाभणार आहे. 

सिंह : दिवसभर उत्साहाने कार्यरत राहाल. तुमच्या कार्यक्षेत्रात यश संपादन करू शकाल. व्यवसायात केलेले कष्ट मार्गी लागणार आहे. 

कन्या : शेअर्समध्ये व व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही. कापड, साडी सेंटर, पेंट्‌स व केटरिंग यामध्ये आर्थिक लाभ होतील. 

तूळ : तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. मित्रांचे, थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. खर्च करण्याकडे अधिक प्रवृत्ती होईल. 

वृश्‍चिक : प्रवासात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. वाहने काळजीपूर्वक चालवावीत. व्यवसायात थोड्याफार अडचणी जाणवतील. 

धनू : वरिष्ठांचे, वडिलधाऱ्यांचे सहकार्य लाभेल. कलेच्या क्षेत्रात विशेष यश मिळेल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. 

मकर : प्रगती वेगाने होणार आहे. हाती घेतलेल्या कामात यश मिळणार आहे. मात्र आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. तुमचा प्रभाव वाढेल. 

कुंभ : काही प्रश्‍न अनपेक्षितरीत्या सुटतील. वैवाहिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. 

मीन : मुलामुलींच्या समस्या उभ्या राहतील. एखादी मानसिक चिंता राहणार आहे. भागीदारी व्यवसायात चांगले वातावरण राहील. 

पंचांग
गुरुवार : आषाढ शुद्ध 10, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.06, सूर्यास्त 7.16, चंद्रोदय दुपारी 2.20, चंद्रास्त रात्री 1.33, भारतीय सौर आषाढ 20, शके 1941.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 11 July 2019