जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 12 जुलै

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

मेष : महत्त्वाची शुभ कामे पुढे ढकलावीत. एखादी गुप्त बातमी समजेल. खर्च योग्य कामासाठी होतील. 

वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. अपेक्षित पत्र व्यवहार व गाठीभेटी होतील. हितसंबंध निर्माण करू शकाल. 

आजचे दिनमान 
मेष : महत्त्वाची शुभ कामे पुढे ढकलावीत. एखादी गुप्त बातमी समजेल. खर्च योग्य कामासाठी होतील. 

वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. अपेक्षित पत्र व्यवहार व गाठीभेटी होतील. हितसंबंध निर्माण करू शकाल. 

मिथुन : आर्थिक क्षेत्रात आघाडी घ्याल. नवीन करारमदार करू शकाल. विरोधकांवर मात कराल. 

कर्क : विद्यार्थ्यांचे प्रश्‍न मार्गी लागतील. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. बौद्धिक जीवनात परिवर्तनाची शक्‍यता आहे. 

सिंह : प्रवास सुखकर होणार आहेत. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होतील. 

कन्या : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळेल. क्षेत्रात नवीन उपक्रम राबवू शकाल. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. 

तूळ : आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही. आर्थिक प्रश्‍नासंदर्भात जे कराल ते यशस्वी होणार. अनेक कामे मनासारखी होतील. 

वृश्‍चिक : मानसिक प्रसन्नता लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. उत्साह, उमेद वाढेल. 

धनू : काही महत्त्वाच्या घटनांची उकल होईल. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. दानधर्माकरिता खर्च कराल. 

मकर : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. अनेकांची मैत्री संपादन कराल. वेगवेगळ्या स्तरावरील लोकांचे सहकार्य मिळवू शकाल. 

कुंभ : व्यवसायात फार मोठी उलाढाल करू शकाल. सामाजिक कार्यात प्रतिष्ठा लाभेल. विरोधकांच्या काही गुप्त कारवाया नजरेसमोर येतील. 

मीन : मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. एखादी भाग्यकारक घटना घडेल. शैक्षणिक क्षेत्रात संधी लाभेल. 

पंचांग
शुक्रवार : आषाढ शुद्ध 11, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.07, सूर्यास्त 7.16, चंद्रोदय दुपारीच 3.15, चंद्रास्त रात्री 2.14, शयनी एकादशी, चातुर्मासारंभ, पंढरपूर यात्रा, भारतीय सौर आषाढ 21, शके 1941.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 12 July 2019