जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 13 जून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जून 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 13 जून

आजचे दिनमान 
मेष : आरोग्य उत्तम राहील. स्वास्थ्य लाभेल. व्यवसायात मनासारखे वातावरण लाभेल. तुम्ही आपले विचार आग्रहाने मांडाल. आपली मते इतरांना पटवून द्याल. इतरांना योग्य मार्गदर्शन करू शकाल. 

वृषभ : व्यवसायात उत्तम स्थिती राहणार आहे. व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आरोग्य चांगले राहणार आहे. प्रसन्नता लाभेल. 

मिथुन : विद्यार्थ्यांना यश लाभेल. मुलामुलींचे प्रश्‍न मनासारखे सुटतील. अपेक्षित गाठीभेटी व पत्रव्यवहार होईल. बोलण्यात कटुता टाळावी. मनासारखे होणार नाही यासाठी मानसिक तयारी हवी. 

कर्क : प्रॉपर्टीच्या क्षेत्रात यश लाभेल. व्यवसायात उत्तम स्थिती राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या राहत्या जागेचे प्रश्‍न सुटतील. प्रवास सुखकर होणार आहेत. 

सिंह : जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. चांगल्या गोष्टी कानावर येतील. नवे स्नेहसंबंध जुळतील. नवे परिचय होतील. ज्यांना बदली हवी आहे त्यांनी प्रयत्न करायला हरकत नाही. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. 

कन्या : शासकीय कामाशी संबंधित व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. आर्थिक क्षेत्रात मनासारखे दान पडणार आहे. विवाहेच्छूंचे विवाह जमण्याची जोरदार शक्‍यता आहे. 

तुळ : मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायाकडे लक्ष केंद्रित कराल. नवीन दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. आपली मते व आपले विचार इतरांना पटवून देऊ शकाल. 

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. व्यवसायात मनासारखे यश लाभेल. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. सध्या कामामध्ये सतत ताण राहणार आहे. 

धनु : एखादी महत्त्वाची बातमी समजेल. बौद्धिक़ व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍ती विशेष यश मिळवतील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. मित्रांचे विशेष सहकार्य लाभेल. 

मकर : तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. कर्तृत्वाला चांगली संधी लाभणार आहे, प्रतिष्ठा लाभणार आहे. 

कुंभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. गुंतवणुकीच्या क्षेत्रात यश मिळेल. ज्यांना बदली हवी आहे त्यांनी प्रयत्न करायला हरकत नाही. 

मीन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. आरोग्य चागंले राहील. मुलामुलींकरिता जादा खर्च करावा लागेल. खर्च वाढणार आहेत. जबाबदारी वाढेल. 

पंचांग
गुरुवार : ज्येष्ठ शुद्ध 11, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 5.59, सूर्यास्त 7.12, चंद्रोदय दुपारी 3.27, चंद्रास्त रात्री 2.51, निर्जला एकादशी, भारतीय सौर ज्येष्ठ 23, शके 1941.

Web Title: Horoscope and Panchang of 13 June 2019