जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 15 जानेवारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

पंचांग 15 जानेवारी 2020 
बुधवार : पौष कृष्ण 5, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय 7.13, सूर्यास्त 6.17, चंद्रोदय रात्री 11, चंद्रास्त सकाळी 10.56, मकर संक्रांत, भारतीय सौर पौष 25, शके 1941. 

दिनमान 15 जानेवारी 2020 
मेष : दिवस आनंदात व समाधानात जाणार आहे. अनेक कामे मार्गी लागतील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. 

वृषभ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. आरोग्य चांगले राहणार आहे. 

मिथुन : धार्मिक कार्याकरिता खर्च कराल. नवे स्नेहसंबंध जुळतील. महत्त्वाचे करारमदार करण्यास दिवस चांगला आहे. 

कर्क : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. 

सिंह : मानसिक प्रसन्नता लाभेल. अनेक कामे हातावेगळी करण्यात यश लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल. 

कन्या : दुपारी 12 नंतरचा कालखंड चांगला आहे. दुपारी 12 नंतर कामे वेगाने पूर्ण होतील. वरिष्ठांची कृपा लाभेल. 

तूळ : दुपारी 12 पूर्वीचा कालखंड चांगला आहे. जुन्या ओळखीला उजाळा मिळेल. धार्मिक कार्याकरिता खर्च कराल. 

वृश्‍चिक : आपणाला संपूर्ण दिवस चांगला आहे. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील. 

धनू : आपणाला आजचा दिवस खूपच चांगला जाणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. विरोधकावर मात कराल. 

मकर : परिस्थिती सुधारणार आहे. अडलेली कामे मार्गी लागणार आहेत. वैवाहिक जीवनात सौख्य लाभणार आहे. 

कुंभ : दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल. आरोग्य चांगले राहणार आहे. 

मीन : महत्त्वाची कामे दुपारी 12 नंतर करावीत. अनेक कामे हातावेगळी करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. 

पंचांग 15 जानेवारी 2020 
बुधवार : पौष कृष्ण 5, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय 7.13, सूर्यास्त 6.17, चंद्रोदय रात्री 11, चंद्रास्त सकाळी 10.56, मकर संक्रांत, भारतीय सौर पौष 25, शके 1941. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 15 January 2020