जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 18 जून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जून 2019

पंचांग 18 जून 2019 
मंगळवार : ज्येष्ठ कृष्ण 1, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6, सूर्यास्त 7.14, चंद्रोदय रात्री 8.10, चंद्रास्त सकाळी 6.44, भारतीय सौर ज्येष्ठ 28, शके 1941. 

आजचे दिनमान 
मेष : जमिनी, प्रॉपर्टी यांचे व्यवहार करण्यास दिवस शुभ आहे. त्यात यश मिळेल. गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. 

वृषभ : कोणत्याही क्षेत्रात यशाची अपेक्षा नको. नुकसानीची शक्‍यता आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. 

मिथुन : जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्‍यता आहे. निर्णय विचारपूर्वक घ्याल. व्यवहारात संघर्षाची चिन्हे आहेत. 

कर्क : संघर्षात अडकून पडणार नाही याची दक्षता घ्यावी. ग्रहमान प्रतिकूल आहे. धोका कोठेही पत्करू नका. 

सिंह : व्यवसायात उत्साहजनक परिस्थिती दिसून येईल. अनेक घटना मनासारख्या होतील. ज्यांना बदली हवी आहे त्यांनी प्रयत्न करावेत. 

कन्या : गुरू, शुक्राचा सहयोग चांगला आहे. अडचणीचे स्वरूप सौम्य होणार आहे. व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. 

तूळ : अनेक गोष्टी मनासारख्या होतील. विविध क्षेत्रात संधी लाभेल. अनुभवाचे क्षेत्रा व्यापक होणार आहे. 

वृश्‍चिक : ग्रहमान संमिश्र आहे. सर्वत्र सावधगिरी हवी. आवडत्या व्यक्‍तींसाठी विशेष खर्च कराल. 

धनू : मानसिक ताणतणाव जाणवतील. अंगावर जबाबदारीचे ओझे येणार आहे. संघर्षात शक्‍ती वाया जाणार आहे. 

मकर : दिवस विशेष प्रतिकूल आहे. वैवाहिक जीवनात तीव्र मतभेद होतील. भागीदारी
व्यवसायात कटकटी जाणवतील. 

कुंभ : अनेक क्षेत्रात यश मिळवू शकाल. सध्या तुमचे सौख्याचे दिवस आहेत, यशाचे दिवस आहेत. जागेचे प्रश्‍न मार्गी लागणार आहेत. 

मीन : अडचणीवर मनोबलाने मात कराल. अनेक निर्णय विचाराने घ्याल. कलेच्या क्षेत्रात यश मिळेल. 

पंचांग 18 जून 2019 
मंगळवार : ज्येष्ठ कृष्ण 1, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6, सूर्यास्त 7.14, चंद्रोदय रात्री 8.10, चंद्रास्त सकाळी 6.44, भारतीय सौर ज्येष्ठ 28, शके 1941. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 18th June 2019