जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 19 जून

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 19 जून

आजचे दिनमान 

मेष : आर्थिक क्षेत्रात समाधानकारक स्थिती राहील. अडचणी आल्या तरी त्यावर मात कराल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. 

वृषभ : मनावर दडपण येणार आहे. वैवाहिक सौख्य मिळेल. महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत. 

मिथुन : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. मानसिक स्थिती बिघडण्याची शक्‍यता आहे. 

कर्क : महत्त्वाचे निर्णय टाळवेत. खर्च वाढणार आहेत. फसवणुकीची शक्‍यता आहे. 

सिंह : विद्यार्थ्यांना विशेष परिश्रम करावे लागतील. अनेकांची साथ मिळेल. आर्थिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लाभ होतील. 

कन्या : कर्तृत्त्वाला संधी मिळेल. तुम्ही आपल्या विचारावर व मतावर ठाम राहाल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. 

तूळ : तुमचा प्रवास गतिमानतेने चालणार आहे. ठरविलेले उद्दिष्ट पार पाडाल. सगळ्या कामात यश मिळणार आहे. 

वृश्‍चिक : आर्थिक आवक होईल. परंतु त्या प्रमाणे नवे खर्चही निर्माण होणार आहेत. महत्त्वाचे निर्णय टाळावेत. 

धनू : अनपेक्षितपणे अडचणी जाणवणार ओत. सतत कामामुळे, अडचणीमुळे कंटाळून जाल. फक्‍त कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. 

मकर : प्रॉपर्टीच्या क्षेत्रात अडचणी येणार आहेत. आर्थिक क्षेत्रात धाडस नको. मुलामुलींची चांगली प्रगती होईल. 

कुंभ : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. मुलामुलींची प्रगती होईल. शैक्षणिक व बौद्धिक़ क्षेत्रात विशेष यश मिळेल. 

मीन : गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. आरोग्य चांगले राहील. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात यश मिळवाल.

पंचांग 19 जून 2019 : बुधवार ः ज्येष्ठ कृष्ण 2, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6, सूर्यास्त 7.14, चंद्रोदय रात्री 9, चंद्रास्त सकाळी 7.34, भारतीय सौर ज्येष्ठ 29, शके 1941.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com