esakal | जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 22 मे
sakal

बोलून बातमी शोधा

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 22 मे

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 22 मे

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 22 मे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

आजचे दिनमान 
मेष :
मूल्यवान वस्तू खरेदी करण्याकरिता दिवस चांगला आहे. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. अडचणीवर मात कराल. 

वृषभ : आरोग्याकडे लक्ष हवे. आर्थिक क्षेत्रात व एकूणच कार्यक्षेत्रात धाडस कटाक्षाने टाळावे. जागरूकता व सावधगिरी हवी. 

मिथुन : हाती घेतलेल्या कामात अडचणी जाणवतील. कोणाच्याही सहकार्यावर अवलंबून राहू नका. कलेच्या क्षेत्रात विशेष यश लाभणार आहे. 

कर्क : नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. प्रॉपर्टीसाठी दिवस शुभ आहे. आर्थिक क्षेत्रात यश मिळणार आहे. 

सिंह : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. व्यवसायाची उलाढाल वाढेल. काहींना सार्वजनिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. 

कन्या : आरोग्य चांगले राहणार आहे. कामाचा ताणतणाव राहील. हाती घेतलेल्या कार्यात सुयश लाभेल. 

तूळ : मित्रांच्या आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. हाती घेतलेली कामे चिवटपणे पार पाडाल. थोरामोठ्यांच्या सहकार्याची अपेक्षा करू नका. 

वृश्‍चिक : एखादी चांगली जबाबदारी सोपवली जाईल. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. 

धनू : आपणास मनोबल वाढवावयास हवे. नवे स्नेहसंबंध जुळतील. काही अनपेक्षित अडचणी निर्माण होणार आहेत. 

मकर : वैवाहिक जीवनात मतभेद वाढतील. एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडणार आहे. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. 

कुंभ : आर्थिक आवक चांगली राहणार आहे. विरोधकावर मात कराल. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्‍तींचा प्रभाव पडणार आहे. 

मीन : व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. आपले विचार ठामपणाने मांडाल. खर्चाचे प्रमाण वाढेल. 

पंचांग
बुधवार : वैशाख कृष्ण 4, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.01, सूर्यास्त 7.04, चंद्रोदय रात्री 10.18, चंद्रास्त सकाळी 8.54, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर ज्येष्ठ 1, शके 1941

loading image