esakal | जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 23 मार्च
sakal

बोलून बातमी शोधा

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 23 मार्च

पंचांग 23 मार्च 2020 
सोमवार : फाल्गुन कृष्ण 14, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.38, सूर्यास्त 6.46, चंद्रोदय सकाळी 6.04, चंद्रास्त सायंकाळी 6.07, दर्श अमावास्या, सोमवती अमावास्या, भारतीय सौर चैत्र 3, शके 1941. 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 23 मार्च

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दिनांक : 23 मार्च 2020 : वार : सोमवार 
आजचे दिनमान 

मेष : उत्साह व उमेद विशेष असणार आहे. अपेक्षित गाठीभेटी पडतील. नवीन परिचय होतील. तुमची रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत. 

वृषभ : उत्साह उत्तम असणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभेल. तुमचे विचार तुम्ही परखडपणे मांडाल. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. 

मिथुन : सकारात्मक मानसिकतेने कार्यरत राहणार आहात. चिकाटी वाढेल. तुमच्यावर असणारी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू शकणार आहात. 

कर्क : अस्वस्थता राहणार आहे. जिद्दीने कार्यरत राहावे लागेल. कामाचा ताण जाणवणार आहे. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवण्याची शक्‍यता आहे. 

सिंह : चिकाटी वाढेल. सकारात्मकपणे कार्यरत राहणार आहात. तुमच्यावर एखादी नवीन जबाबदारी सोपवली जाईल. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. 

कन्या : अनावश्‍यक खर्च वाढणार आहेत. मनोबल उत्तम असणार आहे. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. बेकायदेशीर गोष्टी टाळाव्यात. 

तूळ : आरोग्य उत्तम राहील. सौख्य व समाधान लाभेल. चिकाटीने कार्यरत राहू शकणार आहात. मनोबल वाढेल. आर्थिक कामे मार्गी लागणार आहेत. 

वृश्‍चिक : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. सकारात्मकता वाढेल. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. 

धनू : नवा मार्ग दिसेल. अनपेक्षितपणे प्रवास संभवतो व त्यातून फायदा होईल. चिकाटी वाढेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. 

मकर : आर्थिक कामे यशस्वी होणार आहेत. चिकाटीने कार्यरत राहू शकणार आहात. हितशत्रूंवर मात कराल. अडचणी कमी होणार आहेत. 

कुंभ : कामे यशस्वी होणार आहेत. आर्थिक कामात सुयश लाभेल. हितशत्रूंवर मात करणार आहात. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. 

मीन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. चिकाटी ठेवावी लागेल. शांत व संयम रहावे. मानसिक अस्वस्थता राहील. प्रवास शक्‍यतो टाळावेत. 

पंचांग 23 मार्च 2020 
सोमवार : फाल्गुन कृष्ण 14, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.38, सूर्यास्त 6.46, चंद्रोदय सकाळी 6.04, चंद्रास्त सायंकाळी 6.07, दर्श अमावास्या, सोमवती अमावास्या, भारतीय सौर चैत्र 3, शके 1941.