जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 24 जानेवारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

पंचांग 24 जानेवारी 2020 
शुक्रवार : पौष कृष्ण 30, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय 7.13, सूर्यास्त 6.23, दर्श अमावास्या, भारतीय सौर माघ 4, शके 1941. 

दिनमान 24 जानेवारी 2020 
मेष : सार्वजनिक कामात तुमचा दबदबा राहील. मनोबल उत्तम राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. 

वृषभ : मानसिक अस्वस्थता कमी होईल. रखडलेली कामे मार्गी लावू शकणार आहात. जिद्दीने कार्यरत राहणार आहात. 

मिथुन : कामाचा ताण व दगदग राहील. वादविवादात सहभाग टाळावा. मनोबल कमी असणार आहे. 

कर्क : उत्साही रहाल. कामे मार्गी लावू शकणार आहात. मानसिक अस्वस्थता संपेल. 

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. विनाकारण अडचणींचा सामना करावा लागेल. मनस्तापदायक घटना घडेल. 

कन्या : संततिसौख्य लाभेल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देणार आहात. प्रियजनांसाठी वेळ द्याल. 

तूळ : मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. 

वृश्‍चिक : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहणार आहेत. नवी दिशा सापडेल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. 

धनू : आर्थिक कामाचे नियोजन अचूक ठरेल. प्रवास सुखकर होतील. काहींना एखादी गुप्त वार्ता समजेल. 

मकर : मानसिक अस्वस्थता संपेल. नव्या उत्साहाने व उमेदीने कार्यारंभ कराल. आरोग्य उत्तम राहील. 

कुंभ : प्रवासात अडचणी जाणवतील. काहींना नैराश्‍य जाणवेल. आत्मविश्‍वास कमी राहील. 

मीन : मित्रमैत्रिणी, सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे योग येतील. 

पंचांग 24 जानेवारी 2020 
शुक्रवार : पौष कृष्ण 30, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय 7.13, सूर्यास्त 6.23, दर्श अमावास्या, भारतीय सौर माघ 4, शके 1941. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 24 January 2020