esakal | जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 24 मार्च
sakal

बोलून बातमी शोधा

bhavishya

पंचांग 24 मार्च 2020 
मंगळवार : फाल्गुन कृष्ण 30, चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.37, सूर्यास्त 6.47, भारतीय सौर चैत्र 4, शके 1941.

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 24 मार्च

sakal_logo
By
वृत्तसंस्था

दिनांक : 24 मार्च 2020 : वार : मंगळवार 
आजचे दिनमान 

मेष : प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. अनावश्‍यक कामात वेळ वाया जाईल. काहींची धार्मिक प्रगती होईल. 

वृषभ : जबाबदारी वाढणार आहे. कामाचा ताण वाढेल. बौद्धिक व कला क्षेत्रात लाभ होतील. मनोबल उत्तम. 

मिथुन : सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. चिकाटी वाढेल. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील. 

कर्क : नवा मार्ग दिसेल. अस्वस्थता कमी होणार आहे. आरोग्य सुधारेल. मानसिक ताणतणाव कमी. 

सिंह : दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्‍यता आहे. महत्त्वाची कामे आज नकोत. प्रवास टाळावेत. 

कन्या : आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. सकारात्मकता वाढेल. 

तूळ : हितशत्रूंवर मात कराल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. अनावश्‍यक खर्चांचा सामना करावा लागेल. 

वृश्‍चिक : कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. अनेकांबरोबर सुसंवाद साधाल. प्रवास होणार आहेत. 

धनू : सौख्यकारक घटना घडतील. आरोग्य उत्तम असणार आहे. सर्वत्र सामंजस्य राहील. मानसिक स्वास्थ्य उत्तम. 

मकर : मनोबल उत्तम राहील. आत्मविश्‍वासपूर्वक पावले टाकाल. तुमच्या व्यवसायात सुयश मिळवाल. 

कुंभ : व्यवसायामध्ये अनपेक्षित धनलाभ संभवतो. उधारी वसूल होईल. चिकाटी वाढेल. मनोबल उत्तम राहील. 

मीन : तुमचा उत्साह व उमेद वाढविणारी घटना घडेल. चिकाटी वाढणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभेल. 

पंचांग 24 मार्च 2020 
मंगळवार : फाल्गुन कृष्ण 30, चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.37, सूर्यास्त 6.47, भारतीय सौर चैत्र 4, शके 1941.

loading image