esakal | जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 25 मार्च
sakal

बोलून बातमी शोधा

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 25 मार्च

पंचांग 25 मार्च 2020 
मंगळवार : चैत्र शुद्ध 1, चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.37, सूर्यास्त 6.47, भारतीय सौर चैत्र 5, शके 1941. 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 25 मार्च

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दिनांक : 25 मार्च 2020 : वार : बुधवार 
आजचे दिनमान 

मेष : काहींची आध्यात्मिक प्रगती होणार आहे. धार्मिक कार्यात सहभाग वाढणार आहे. काहींची मात्र, अनावश्‍यक कामात वेळ वाया जात असल्याने चिडचिड होणार आहे. 

वृषभ : आर्थिक कामे मार्गी लावू शकणार आहात. नवीन कार्यारंभास आपल्याला अनुकूलता लाभणार आहे. मनोबल उत्तम असणार आहे. आनंदी व आशावादी राहणार आहात. 

मिथुन : व्यवसायातील महत्त्वाची कामे पूर्ण करू शकणार आहात. शुभ कामासाठी तसेच कोणत्याही कार्यारंभासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. आनंदी रहाल. 

कर्क : तुमचा प्रभाव वाढेल. चिकाटीने कार्यरत रहाल. आनंदी राहणार आहात. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. मनोबल उत्तम असणार आहे. 

सिंह : कामाचा ताण व दगदग राहणार आहे. काहींची धावपळ होणार आहे. प्रवासात काळजी घ्यावी लागणार आहे. शुभ कार्यामध्ये काहींना अडचणी जाणवण्याची शक्‍यता आहे. 

कन्या : आनंदी व आशावादी रहाल. कामे मार्गी लागणार आहेत. मनोबल व आत्मविश्‍वास कायम ठेवावे लागणार आहेत. अतिरिक्त कामाचा ताण राहण्याची शक्‍यता आहे. 

तुळ : अनावश्‍यक कामात वेळ वाया जाणार आहे. काहींना एखाद्या मनस्तापदायक घटनेला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. दैनंदिन कामामध्ये ताळमेळ असणार नाही. 

वृश्‍चिक : जिद्द वाढणार आहे. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. मनोबल उत्तम राहील. स्वास्थ्य व समाधान लाभेल. प्रियजन भेटणार आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. आनंदी राहणार आहात. 

धनु : गुंतवणुकीस अनुकूलता लाभणार आहे. प्रॉपर्टीची कामे होतील. व्यवसायात काही अनुकूल बदल करू शकाल. शुभ कामास अनुकूलता लाभेल. उत्साहाने कार्यरत रहाल. 

मकर : जिद्दीने कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावणार आहात. मनोबल उत्तम असणार आहे. चिकाटी वाढणार आहे. स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. 

कुंभ : कार्यसाफल्यामुळे आनंदी राहणार आहात. काहींना अचानक धनलाभ संभवतो. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. आनंदी रहाल. शुभ कामासाठी अनुकूलता लाभणार आहे. 

मीन : उत्साही राहणार आहात. मनोबल उत्तम असणार आहे. अनेक बाबतीमध्ये तुम्हाला अनुकूलता लाभेल. शुभ कार्यास दिवस चांगला आहे. दैनंदिन कामात सुयश लाभेल. 

पंचांग 25 मार्च 2020 
मंगळवार : चैत्र शुद्ध 1, चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.37, सूर्यास्त 6.47, भारतीय सौर चैत्र 5, शके 1941.