esakal | जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 26 मार्च
sakal

बोलून बातमी शोधा

bhavishya

आजचे पंचांग
गुरुवार : चैत्र शुद्ध 2, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.36, सूर्यास्त 6.47, चंद्रास्त रात्री 8.30, मु. शाबान मासारंभ, भारतीय सौर चैत्र 6, शके 1942

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 26 मार्च

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दिनांक : 26 मार्च 2020 : वार : गुरुवार 
आजचे दिनमान 

मेष : कामाचा ताण कमी राहील. तुमचा उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. आशावादीपणे कार्यरत रहाल. मनोबल उत्तम असणार आहे. चिकाटी वाढणार आहे. 

वृषभ : मनोबल कमी राहील. अस्वस्थता जाणवेल. आर्थिक कामे आज नकोत. काहींना दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. प्रवास नकोत. 

मिथुन : आर्थिक लाभ होणार आहेत. मनोबल उत्तम असणार आहे. चिकाटी वाढणार आहे. कामाचा ताण कमी होईल. एखादी आनंददायी घटना घडेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. 

कर्क : सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती असणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. आर्थिक कामे मार्गी लागतील. स्वास्थ्य लाभेल. 

सिंह : अस्वस्थता कमी होईल. कामे मार्गी लागतील. दैनंदिन कामात स्वास्थ्य लाभेल. चिकाटीने कार्यरत राहू शकाल. नातेवाईकांच्या अनपेक्षितपणे गाठीभेटी पडतील. 

कन्या : प्रवासामध्ये काळजी हवी. काहींना एखादी चिंता सतावेल. मनोबल कमी असणार आहे. आर्थिक कामात सुयश लाभेल. कौटुंबिक जीवनात मतभेद टाळावेत. वाहने सावकाश चालवावीत. 

तुळ : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. वैवाहिक जीवनात विशेष सुसंवाद राहील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभणार आहे. 

वृश्‍चिक : अनपेक्षितपणे मोठे खर्च संभवतात. आरोग्याची काळजी घ्यावी. मनोबल कमी राहण्याची शक्‍यता आहे. दैनंदिन कामात अडचणी येत असल्यामुळे चिडचिड होणार आहे. 

धनु : आर्थिक कामे होतील. मनोबल उत्तम राहील. एखादी आनंददायी घटना घडेल. मन प्रसन्न राहील. अनेकांबरोबर सुसंवाद साधाल. काहींना विविध लाभ संभवतात. 

मकर : मानसिक प्रसन्नता लाभेल. आनंदी व आशावादीपणाने कार्यरत राहणार आहात. चिकाटी वाढणार आहे. हितशत्रुंवर मात कराल. मनोबल उत्तम राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. 

कुंभ : नातेवाईकांच्या गाठीभेटी पडतील. जिद्दीने कार्यरत रहाल. आत्मविश्‍वासपूर्वक पावले टाकाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सुसंधी लाभेल. प्रवासाचे योग येतील. 

मीन : आर्थिक कामास अनुकूलता लाभणार आहे. काहींना अचानक धनलाभ संभवतो. आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात एखादी आनंददायी घटना घडेल. स्वास्थ्य लाभणार आहे. 

आजचे पंचांग
गुरुवार : चैत्र शुद्ध 2, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.36, सूर्यास्त 6.47, चंद्रास्त रात्री 8.30, मु. शाबान मासारंभ, भारतीय सौर चैत्र 6, शके 1942

loading image