जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 29 जुलै

सकाळ वृत्तसेवा
Monday, 29 July 2019

पंचांग 29 जुलै 2019 
सोमवार : आषाढ कृष्ण 12, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.13, सूर्यास्त 7.11, चंद्रोदय पहाटे 3.02, चंद्रास्त दुपारी 4.40, सोमप्रदोष, भारतीय सौर श्रावण 7, शके 1941. 

आजचे दिनमान 
मेष : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. आरोग्य चांगले राहणार आहे. संततिसौख्य लाभेल. 

वृषभ : ट्रान्स्पोर्ट, कुरिअर क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्‍तींना यश लाभेल. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना सुसंधी लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. 

मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. व्यवसायामधील उलाढाल वाढेल. शासकीय कामे मार्गी लागतील. 

कर्क : काहींना मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. एखाद्या गोष्टीबद्दल चिंता लागून राहील. मुलामुलींबरोबर संवाद साधाल. 

सिंह : काहींचा धार्मिक कार्याकडे ओढा राहील. चारचौघातील विवाद टाळावेत. आर्थिक लाभाचे प्रमाण हळूहळू वाढणार आहे. 

कन्या : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. वैवाहिक जीवनात सौख्य व समाधान लाभेल. कला क्षेत्रातील व्यक्‍तींना मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. 

तूळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. व्यवसायामध्ये उलाढाल वाढणार आहे. 

वृश्‍चिक : प्रवासामध्ये काळजी घ्यावी. काहींना सतत एखादी चिंता लागून राहील. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. 

धनू : जोडीदाराचा सल्ला शांतपणे ऐकून घ्यावा. कर्मचारी वर्गाबरोबर सुसंवाद साधू शकाल. काहींना प्रतिकूलता जाणवेल. 

मकर : शत्रूपिडा नाही. आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. 

कुंभ : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देणे गरजेचे भासेल. गुंतवणुकीचे कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. लांबचे प्रवास शक्‍यतो टाळावेत. 

मीन : कलेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्‍तींचे आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील. नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील. 

पंचांग 29 जुलै 2019 
सोमवार : आषाढ कृष्ण 12, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.13, सूर्यास्त 7.11, चंद्रोदय पहाटे 3.02, चंद्रास्त दुपारी 4.40, सोमप्रदोष, भारतीय सौर श्रावण 7, शके 1941. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 29 July 2019