esakal | जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 30 मार्च
sakal

बोलून बातमी शोधा

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 30 मार्च

आजचे पंचांग
सोमवार : चैत्र शुद्ध 6, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.32, सूर्यास्त 6.48, चंद्रोदय सकाळी 10.21, चंद्रास्त रात्री 11.56, भारतीय सौर चैत्र 10, शके 1942

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 30 मार्च

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दिनांक : 30 मार्च 2020 : वार : सोमवार 
आजचे दिनमान 

मेष : व्यवसायातील आर्थिक कामे पूर्ण होतील. उधारी, उसनवारी वसूल होईल. प्रियजनासाठी वेळ देवू शकाल. अपेक्षित पत्र व्यवहार होईल. काहींना गुप्त वार्ता समजतील. 

वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. 

मिथुन : प्रवास शक्‍यतो टाळावेत. दैनंदिन कामात अडचणी संभवतात. अतिरिक्त कामाचा ताण राहील. तुमचे मन नाराज राहील. महत्त्वाची कामे नकोत. वाहने सावकाश चालवावीत. 

कर्क : प्रियजनांसाठी वेळ देवू शकाल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. प्रवास सुखकर होतील. नवीन परिचय होतील. 

सिंह : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. मानसन्मानाचे योग येतील. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. प्रवासास दिवस अनुकूल आहे. कामे मार्गी लागतील. 

कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. चिकाटी वाढेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो. 

तुळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत. प्रवासात अडचणी संभवतात. मनोबल कमी राहणार आहे. महत्त्वाची कामे आज नकोत. आर्थिक सुयश लाभेल. 

वृश्‍चिक : जोडीदाराचे सहकार्य लाभेल. भागीदारी फायदा होईल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. प्रवास सुखकर होतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. 

धनु : अस्वस्थता राहील. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. चिडचिड होईल. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रवासाचे नियोजन नको. 

मकर : आर्थिक लाभ होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी घेण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. काहींना अनपेक्षित धनलाभ संभवतो. विविध लाभ होतील. 

कुंभ : प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे होतील. तुमचा प्रभाव राहील. मानसन्मानाचे योग येतील. सार्वजनिक कार्यात उत्साहाने कार्यरत रहाल. महत्त्वाच्या कामांचे नियोजन करू शकाल. 

मीन : मानसिक प्रसन्नता लाभेल. नवी दिशा सापडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असलेली सुसंधी लाभेल. प्रसिद्धीचे योग येतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

आजचे पंचांग
सोमवार : चैत्र शुद्ध 6, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.32, सूर्यास्त 6.48, चंद्रोदय सकाळी 10.21, चंद्रास्त रात्री 11.56, भारतीय सौर चैत्र 10, शके 1942