जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 4 सप्टेंबर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

पंचांग 4 सप्टेंबर 2019 
बुधवार : भाद्रपद शुद्ध 6, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.47, चंद्रोदय सकाळी 11.04, चंद्रास्त रात्री 10.55, सूर्यषष्ठी, भारतीय सौर भाद्रपद 13, शके 1941.

आजचे दिनमान 
मेष : व्यवसायात व तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन प्रयोग करू शकाल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. 

वृषभ : खर्च योग्य कामासाठी होतील. प्रॉपर्टीसाठी व गुंतवणुकीसाठी दिवस अनिष्ट आहे. कामाचा ताण वाढेल, दगदग वाढेल. 

मिथुन : नवे स्नेहसंबंध जुळतील. व्यवसायात प्रगतीची चढती कमान राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात विशेष कामगिरी करून दाखवाल. 

कर्क : व्यवसायात प्रगती होईल. उधारी, उसनवारी वसूल होईल. शेअर्समध्ये यश अनुभवण्यास ग्रहमान अनुकूल आहे. 

सिंह : प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल होईल. कौटुंबिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील. कणखरपणे योजना राबवाल. 

कन्या : विरोधकावर मात कराल. हितशत्रूंच्या कारवाया हाणून पाडाल. महत्त्वाच्या व्यवहारामध्ये फसवणुकीची शक्‍यता आहे. 

तूळ : कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित संधी लाभेल. थोरामोठ्यांचे परिचय होतील. 

वृश्‍चिक : व्यवसायात धाडस टाळावे. व्यवसायाची वाढ गतिमानतेने होणार आहे. नोकरीत अपेक्षेपेक्षा यश मिळेल. 

धनू : अपेक्षेप्रमाणे लोकांचे सहकार्य लाभणार आहे. मुलामुलींची चांगली प्रगती होईल. सामाजिक क्षेत्रात चांगले यश मिळेल. 

मकर : मुला-मुलींकरिता जादा खर्च करावा लागेल. भावनेवर नियंत्रण ठेवावे लागेल. वरिष्ठ व मित्र ऐनवेळी शब्द फिरवतील. 

कुंभ : समाजात तुम्हाला विशेष मान मिळणार आहे. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. तुमच्यातले नेतृत्त्व चालून येईल. 

मीन : आरोग्य चांगले राहील. शैक्षणिक क्षेत्रात अपेक्षेप्रमाणे यश लाभणार नाही. कर्मचारी वर्गाबरोबर मतभेद वाढण्याची शक्‍यता आहे. 

पंचांग 4 सप्टेंबर 2019 
बुधवार : भाद्रपद शुद्ध 6, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.47, चंद्रोदय सकाळी 11.04, चंद्रास्त रात्री 10.55, सूर्यषष्ठी, भारतीय सौर भाद्रपद 13, शके 1941.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 4 September 2019