जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 5 जुलै

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 July 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 5 जुलै

आजचे दिनमान 
मेष : प्रवास सुखकारक होणार आहेत. गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. 

वृषभ : इतरांना तुम्ही योग्य मार्गदर्शन करू शकाल. नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. 

मिथुन : अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. 

कर्क : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. काहींना अधिकारप्राप्ती होणार आहे. धाडसाने कामे मार्गी लावू शकाल. 

सिंह : आर्थिक क्षेत्रात कटाक्षाने धाडस टाळावे. प्रलोभनाला बळी पडू नका. खर्च अकारण होणार आहेत. 

कन्या : हवे ते लाभणार आहे. ज्या गोष्टीची वाट पाहत होता ती गोष्ट मार्गी लागेल. अनेक नवे मित्र भेटतील. 

तूळ : अशक्‍य ते शक्‍य करून दाखवाल. जादूसारखे यश मिळेल. सर्व क्षेत्रात चौफेर प्रगती होईल. 

वृश्‍चिक : आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. गाठीभेटी व परिचय होतील. अपेक्षित फोन होतील. 

धनू : व्यवसायात धाडस नको. व्यवसायात चढ-उतार होणार आहेत. साडेसातीची तीव्रता जाणवेल. 

मकर : काहींना प्रवासाचे योग येतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. 

कुंभ : व्यवसायात अडचणी जाणवतील. आर्थिक लाभ मनासारखे होणार आहेत. वैवाहिक जीवनात चांगले वातावरण राहील. 

मीन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागणार आहेत. काही महिन्यांचे निर्णय घेण्यास दिवस चांगला आहे. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. 

पंचांग
शुक्रवार : आषाढ शुद्ध 3, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क, सूर्योदय 6.04, सूर्यास्त 7.16, चंद्रोदय सकाळी 8.20, चंद्रास्त रात्री 9.52, मु. जिल्काद मासारंभ, भारतीय सौर आषाढ 14, शके 1941.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 5 July 2019