जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 8 फेब्रुवारी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

पंचांग 8 फेब्रुवारी 2020 
शनिवार : माघ शुद्ध 14, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय 7.09, सूर्यास्त 6.31, चंद्रोदय सायंकाळी 5.35, चंद्रास्त सकाळी 6.14, भारतीय सौर माघ 19, शके 1941. 

दिनमान 8 फेब्रुवारी 2020 

मेष : मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. तुमचे मन आनंदी राहणार आहे. तुम्ही आज आशावादीपणाने कार्यरत राहणार आहे. 

वृषभ : जिद्द वाढणार आहे. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. प्रवास सुखकर होतील. 

मिथुन : आर्थिक कामे मार्गी लावू शकणार आहात. काहींना अचानक धनलाभ संभवतो. चिकाटी वाढणार आहे. 

कर्क : गेले दोन दिवसांपेक्षा आज तुम्ही उत्साही राहणार आहात. मनोबल उत्तम राहील. चिकाटी वाढेल. 

सिंह : मानसिक अस्वस्थता राहील. काहींना अनावश्‍यक कामे करावी लागतील. खर्च वाढणार आहेत. 

कन्या : अपेक्षित गाठीभेटी पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. 

तूळ : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा दबदबा राहील. मनोबल उत्तम राहणार आहे. 

वृश्‍चिक : आरोग्य उत्तम राहणार आहे. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता आता संपणार आहे. उत्साहाने दिवसाची सुरुवात कराल. 

धनू : प्रवासाचे योग येणार आहेत. मात्र प्रवासात सावधानता हवी. आज कोणत्याही प्रकारचा अतिउत्साहीपणा टाळावा. 

मकर : आरोग्य उत्तम राहील. कामे मार्गी लागणार आहेत. दैनंदिन कामात सुयश लाभेल. 

कुंभ : वाहने चालवताना सावधानता हवी. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. उत्साह कमी राहील. 

मीन : चिकाटीने कार्यरत राहणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. 

पंचांग 8 फेब्रुवारी 2020 
शनिवार : माघ शुद्ध 14, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय 7.09, सूर्यास्त 6.31, चंद्रोदय सायंकाळी 5.35, चंद्रास्त सकाळी 6.14, भारतीय सौर माघ 19, शके 1941. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 8 February 2020