जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 8 जून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जून 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 8 जून

आजचे दिनमान 
मेष : अडचणीवर मात कराल. जिद्द, चिकाटी व धाडस यामध्ये सफलता लाभेल. आर्थिक आघाडीवर चांगली स्थिती आहे. 

वृषभ : कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. 

मिथुन : आर्थिक क्षेत्रात सुधारणा होईल. दूध, भाजीपाला, केमिकल्स या क्षेत्रात विशेष लाभ होतील. प्रॉपर्टीच्या कामात अडचणी येणार आहेत. 

कर्क : संमिश्र स्थिती राहणार आहे. नोकरीत उत्तम स्थिती राहील. निर्णय चुकण्याची शक्‍यता आहे. 

सिंह : धार्मिक कार्यात व दानधर्मात खर्च कराल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची आघाडी राहणार आहे. कर्तृत्त्वाला संधी मिळेल. 

कन्या : प्रगती वेगाने होणार आहे. शासकीय कामात यश लाभेल. तुमचा वैचारिक प्रभाव पडणार आहे. 

तूळ : काहींना प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होतील. सुसंधी, कीर्ती, प्रतिष्ठा लाभेल. 

वृश्‍चिक : मित्रांच्याबाबतीत खबरदारी घ्यावी. वैवाहिक सौख्य लाभेल. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. 

धनू : साडेसाती चालू आहे. ग्रह प्रतिकूल आहेत. अडचणींना तोंड द्यावे लागेल. 

मकर : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. 

कुंभ : प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना चांगली संधी लाभणार आहे. गुंतवणुकीला चांगला दिवस आहे. प्रगती वेगाने होणार आहे. 

मीन : नवे स्नेहसंबंध जुळतील. नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. आरोग्य चांगले राहणार आहे. 

पंचांग
शनिवार : ज्येष्ठ शुद्ध 6, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क, सूर्योदय 5.59, सूर्यास्त 7.11, चंद्रोदय सकाळी 10.35, चंद्रास्त रात्री 11.56, सूर्याचा मृग नक्षत्रप्रवेश, वाहन उंदीर, भारतीय सौर ज्येष्ठ 18, शके 1941.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 8 June 2019