जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 9 जानेवारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

पंचांग 9 जानेवारी 2020 
गुरुवार : पौष शुद्ध 14, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.11, सूर्यास्त 6.10, चंद्रोदय दुपारी 4.52, चंद्रास्त पहाटे 5.37, भारतीय सौर पौष 19, शके 1941. 

दिनांक : 9 जानेवारी 2020 : वार : गुरुवार 
आजचे दिनमान 

मेष : आर्थिक लाभाच्या संदर्भात नवीन प्रस्ताव येतील. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. शासकीय कामात यश लाभेल. उत्साह व उमेद वाढेल. 

वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. व्यवसायाकडे तुम्ही अधिक लक्ष द्याल. शासकीय कामासाठी अजूनही ग्रहमान अनुकूल नाही. 

मिथुन : तुमच्या वैचारिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्‍यता आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला चांगली संधी लाभणार आहे. 

कर्क : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. दिवस मोठ्या प्रमाणावर प्रतिकूल आहे. प्रवास शक्‍यतो टाळावेत. प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. 

सिंह : व्यवसायात नवीन करारमदार करण्यास दिवस चांगला. शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश लाभेल. वैवाहिक जीवनात अत्यंत समाधानकारक वातावरण राहील. 

कन्या : तुमच्यावर जबाबदारी सोपवली जाईल. कामाचा ताण जाणवेल. मित्रांच्या सहकार्यावर अवलंबून राहू नका. आर्थिक क्षेत्रात धाडस नको. 

तूळ : तुम्हाला आवश्‍यक ती संधी लाभणार आहे. आरोग्य चांगले राहील. काहींना प्रवासाचे योग येतील. अनेक कामे हातावेगळी करण्यात यश लाभेल. 

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. हाती घेतलेल्या कामात अडचणी येणार आहेत. आर्थिक स्थिती मात्र उत्तम राहणार आहे. 

धनू : व्यवसायामध्ये एखादी चांगली घटना घडेल. प्रत्येक गोष्ट करताना सावधगिरी हवी. एखाद्या व्यवहारात फसण्याची शक्‍यता आहे. 

मकर : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. व्यवसायातील तुमचे निर्णय अचूक ठरणार आहेत. मनोरंजनाकडे कल वाढेल. 

कुंभ : नवीन करारमदार करण्यास दिवस चांगला आहे. कौटुंबिक जीवनात प्रसन्नतेचे वातावरण राहील. सांस्कृतिक कार्यात सहभागी होण्याची संधी. 

मीन : नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्‍यता. कामाचा ताण वाढणार आहे. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. नोकरीत समाधानकारक स्थिती. 

पंचांग 9 जानेवारी 2020 
गुरुवार : पौष शुद्ध 14, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.11, सूर्यास्त 6.10, चंद्रोदय दुपारी 4.52, चंद्रास्त पहाटे 5.37, भारतीय सौर पौष 19, शके 1941. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 9 January 2020