
श्रीराम भट - saptrang@esakal.com
कर्मफलांशी खेळणारे ज्योतिषशास्त्र अध्यात्माशी जवळीक साधत ब्रह्मविद्याही जाणून घेते म्हणा किंवा ब्रम्हहृदयाचे स्पंदन अनुभवेल. भावभावनांच्या मुळाशी जात किंवा त्याची खोली गोठत किंवा तसा योग साधत या असार संसारातील भीती काढून टाकत माणसाल शांतचित्त करण्याचा प्रयत्न करत असते.
मनुष्य, देव आणि राक्षस यांच्या कर्मांच्या आलेखाशी खेळणारे ज्योतिष त्यांच्या कर्मफलांचा रोख निश्चितच जाणते आणि या जाणण्यातूनच अर्थातच त्याच्या जन्म पत्रिकेतील ग्रहाचा किंवा ग्रहयोगाचा अभ्यास करत माणसाचा विशिष्ट ग्रहांचा भ्रांतीचा चष्मा काढून टाकत खरी ज्ञानदृष्टी देत असते. हे ज्ञानदृष्टी देणारे ज्योतिषच वेदांग होऊ शकते आणि मग ज्ञानेश्वर म्हणतात त्याप्रमाणे...
‘ज्ञानाग्रीचेनि मुखे जेणे जाळिली कर्मे अशेखे
तो परब्रह्मचि मनुष्य वेखे वोळखू ते
असे हे ज्ञान प्राप्त होण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील योग अभ्यासत खऱ्या ज्ञान योगाकडे वाटचाल करण्यास मदत होत असते.