जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 10 जून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जून 2019

मेष : शासकीय कामाशी संबंधित व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. साडी सेंटर, केटरर्स यांना विशेष आर्थिक प्राप्ती होईल. 

वृषभ : व्यवसायाची उलाढाल वाढेल. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश लाभेल. गुंतवणुकीला चांगला दिवस आहे. 

मेष : शासकीय कामाशी संबंधित व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. साडी सेंटर, केटरर्स यांना विशेष आर्थिक प्राप्ती होईल. 

वृषभ : व्यवसायाची उलाढाल वाढेल. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश लाभेल. गुंतवणुकीला चांगला दिवस आहे. 

मिथुन : धाडस करताना व धाडसाने निर्णय घेताना अधिक विचार हवा. जबाबदारीमुळे कामाचा ताण व दगदग वाढणार आहे. 

कर्क : आर्थिक आवक चांगली होणार आहे. उसनवारी वसूल होईल. नोकरीत अपेक्षेपेक्षा अधिक चांगले वातावरण आढळेल. 
सिंह : तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. तुमच्या शब्दाला विशेष वजन प्राप्त होईल. सर्वत्र यश संपादन करू शकाल. 

कन्या : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. जबाबदारी वाढल्यामुळे मेटाकुटीला याल. काहींना गुरूकृपा लाभेल. 

तूळ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. नवनवीन संधी मिळणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. 

वृश्‍चिक : नोकरीत उत्तम स्थिती राहील. विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्‍यता आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. 

धनू : हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळणार आहे. हळूहळू परंतु प्रगती होईल. व्यवसायात प्रगती होईल. 

मकर : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. संगीत, नाट्य या क्षेत्रात विशेष यश मिळेल. थोरामोठ्यांचे, वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. 

कुंभ : अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळवू शकाल. आरोग्य चांगले राहणार आहे. प्रॉपर्टी व गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. 

मीन : मुलामुलींच्याकरिता जादा खर्च करावा लागेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. अनेकांशी चांगले संबंध राहतील.

पंचांग :
सोमवार : ज्येष्ठ शुद्ध 8, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय 5.59, सूर्यास्त 7.11, चंद्रोदय दुपारी 12.37, चंद्रास्त रात्री 12.44, दुर्गाष्टमी, भारतीय सौर ज्येष्ठ 20, शके 1941.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope fro 10th June