राशिभविष्य

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

आचारभंग करणारी हाडं !

‘रोग हाडी-मांशी भिनणं’ असा शब्दप्रयोग नेहमी वापरण्यात येतो. हाडा-मांसाच्या शरीराचं लोढणं माणूस सगळीकडं वागवत असतो किंवा ते वागवणं त्याला भागही पडत असतं. माणसाच्या शरीरातल्या हाडांची वळवळ सतत सुरू असते. सध्या हाडांची दुखणी-खुपणी फार वाढलेली आहेत. रुतणं, अडकणं, घसरणं, नको तिथं तरफडणं, हाता-पायांचे वेगवेगळे चाळे करणं यामुळं माणूस निश्‍चितपणे गोत्यात येत असतो! माणसाचं जीवन म्हणजे एका अर्थानं हाडांच्या करामतीच होत. कर्म, करामती आणि कारवाया करणारी जीवनाची सर्कस हाता-पायांची ही हाडंच करत असतात.

आचारभंग करणारी हाडं !

‘रोग हाडी-मांशी भिनणं’ असा शब्दप्रयोग नेहमी वापरण्यात येतो. हाडा-मांसाच्या शरीराचं लोढणं माणूस सगळीकडं वागवत असतो किंवा ते वागवणं त्याला भागही पडत असतं. माणसाच्या शरीरातल्या हाडांची वळवळ सतत सुरू असते. सध्या हाडांची दुखणी-खुपणी फार वाढलेली आहेत. रुतणं, अडकणं, घसरणं, नको तिथं तरफडणं, हाता-पायांचे वेगवेगळे चाळे करणं यामुळं माणूस निश्‍चितपणे गोत्यात येत असतो! माणसाचं जीवन म्हणजे एका अर्थानं हाडांच्या करामतीच होत. कर्म, करामती आणि कारवाया करणारी जीवनाची सर्कस हाता-पायांची ही हाडंच करत असतात.

हल्ली माणसं व्यर्थ हात-पाय झाडत असतात...अर्थात झोपेतही आणि जागेपणीही! झोपेत आणि जागेपणीही स्वतःला आणि दुसऱ्याला उपद्रव देणाऱ्या मनुष्यप्राण्याच्या हाता-पायाची हाडं ही जीवनाचा आधारस्तंभ आहेत म्हणे! माणसाच्या अशा या शरीरगृहातून सतत कण्हण्या-कुंथण्याचे आवाज येऊनही सुखवस्तू म्हणवून घेणारा

माणूस म्हणजे एक अजब वस्तू किंवा वास्तू आहे!!
आचारभंगाची हाडे। रुपती इंद्रियांपुढे। 
मरे जरी तेणेंकडे। क्रिया जाय।। - ज्ञानदेव

माणसाच्या जीवनात इंद्रियांच्या संगतीतून हाडांचा नाच किंवा नंगानाच म्हणा सदैव सुरू असतो (इथं ‘सदैव’ म्हणजे दैवाप्रमाणे). अनेक वेळा ही आचारभंग करणारी हाडं ‘मरतंय तरी तिथं तरफडतंय’ अशीच माणसाची अवस्था करत असतात. मित्रहो, वृश्‍चिक हे नियतीचे पाय आहेत. अशा या नियतीच्या राशीत हाडांचा अधिपती शनी हा रवीशी युती करत आहे. राजकारणातली आचारसंहिता आणि घरातली आचारसंहिता वेगळी अशी नसतेच.  गीताजयंतीच्या या सप्ताहात गीतेमधली आचारसंहिता पाळा. नाहीतर याल गोत्यात !

प्रियजनांचा सहवास लाभेल
मेष :
शुक्राची तेजस्विता विलक्षण फलदायी. अप्रतिम खरेदी. घरात सतत प्रियजनांचा वावर. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना सोमवारी विजयोत्सव साजरा करतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींनी घरातल्या वृद्धांची काळजी घ्यावी. पासपोर्ट सांभाळावा.

ओळखीतून मोठे लाभ होतील
वृषभ :
सप्ताहाची सुरवात कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना वैयक्तिक झगमगाटाची. ओळखी-मध्यस्थींतून मोठे लाभ. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना बुधवार अकारण चिंतेचा. स्त्रियांशी वाद घालणं टाळाच. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना मनाविरुद्ध प्रवास करावा लागेल. अलंकार जपा.

व्यावसायिक मालमत्ता सांभाळा
मिथुन :
सप्ताहाचं बजेट नुकसानीचं राहील. शनी-मंगळाची अन्योन्यस्थिती वाहन, यंत्र वा कामगार इत्यादी संदर्भातून विरोधी. व्यावसायिक मालमत्तेची सुरक्षा बाळगा. सोमवार पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींसाठी अतिशय अनुकूल. घरातल्या प्रिय व्यक्तींच्या उत्कर्ष. होतकरूंना नोकरी लागेल.

सहजीवन प्रसन्न राहील
कर्क :
शुक्रभ्रमणाच्या तेजस्वितेमुळं घरातलं सहजीवन प्रसन्न राहील. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना ‘गीत गाता चल’ असा सुखद अनुभव येईल. गुरुवार पहाटे गुरुस्मरण करा. शांतता अनुभवाल. व्याधिग्रस्तांनी काळजी घ्यावी. जागरण होण्याची 
शक्‍यता. 

बॅंकेची कामं मार्गी लागतील
सिंह :
रवी-शनी सहयोग आणि मंगळाची स्थिती या सप्ताहात प्रभावी ठरेल. वाद घालणाऱ्या माणसांपासून सावध राहा. सिग्नल तोडणाऱ्या बेशिस्त मंडळींपासूनही दूरच राहा. गुरुभ्रमणाचा अंडरकरंट राहील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना दि. पाच व सहा हे दिवस अतिशय अनुकूल. बॅंकेची कामं मार्गी लागतील

हातात पैसा खेळेल !
कन्या :
मार्गशीर्ष महिन्याची सुरवात अप्रतिमच राहील. आजचा रविवार उत्तम लक्षणांचा. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींच्या हातात सतत पैसा खेळेल. गुरुवार सगळ्या बाजूंनी शुभ. नोकरीत सन्मान होईल. पगारवाढ मिळेल.

नोकरीत राजकारण नको!
तूळ :
साडेसातीतलं शेवटचं अवघड वळण! ‘अती घाई, संकटात जाई’ ही सुप्रसिद्ध पाटी लक्षात ठेवा! वाहन चालवताना जपा. नोकरीतल्या राजकारणात पडू नका. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना सुवार्ता कळतील. सप्ताहाचा शेवट शत्रुत्वाचा. विशाखास जाच. पोलिस जपा.

काळजीपूर्वक पावलं टाका
वृश्‍चिक :
साडेसातीतल्या शनी-मंगळाची अन्योन्यस्थिती आणि रवी-शनी सहयोग यामुळं जगणं काहीसं कडवट होईल! ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी हा सप्ताह उपद्रवमूल्य असलेलाच. काळजीपूर्वक पावलं टाका. काहींना अग्निभय. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवारी सुवार्ता मिळतील. 

भावनांवर नियंत्रण ठेवा
धनू :
हा सप्ताह शनी-मंगळाच्या पापकर्तरीतून जाणवणारा. नका खेळू विस्तवाशी. भावनांवर नियंत्रण ठेवा. नका खेळू जुगार. मूळ नक्षत्राच्या व्यक्ती पुत्रोत्कर्षानं धन्य होतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट नुकसानीच्या भयाचा. काहींना ब्लॅकमेलिंग होण्याची शक्‍यता.

नोकरीत सुवर्णयुग अवतरेल!
मकर :
या सप्ताहातील ही एक गाजणारी रास. विशिष्ट यशानं भाव खाऊन जाल! सप्ताहाची सुरुवात श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना अप्रतिम. नोकरीतलं सुवर्णयुग सुरू होईल. सप्ताहाच्या शेवटी कुठल्याही स्त्रीशी वाद घालू नका.

आपापसातले गैरसमज टाळा 
कुंभ :
रवी-शनी सहयोग आणि मंगळाचं उपद्रवमूल्य जगण्यावर सावट आणेल. सतत गुप्तचिंता घेरतील. सप्ताहाच्या शेवटी पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती निस्तेज अवस्थेत फिरतील. प्रेमिकांनो, आपापसातले गैरसमज टाळा. नका तोडू भावबंध!

नव्या नोटा हातात खेळतील!
मीन :
सप्ताहात नव्या नोटा हातात खेळतील! अतिशय प्रसन्न राहाल. एकूणच चैन-चंगळ-मौज-मजेचा हा काळ आहे. यंदाचा नाताळ व्यावसायिक भरभराटीचाच. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती  श्रीमंतांच्या यादीत जातील! गुरुवार भाग्य घेऊन येणारा. विवाह ठरवाल.

Web Title: Horoscopes