Krishna Janmashtami : अशी करा "गोकुळाष्टमी' साजरी  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

how to celebrate Krishna Janmashtami

"गोविंदा आला रे आला 
मटकी सांभाल ब्रिजबाला रे' 
लहान, थोरांना, सर्वांना आनंद देणारा हा गोकुळाष्टमीचा उत्सव आहे. 

Krishna Janmashtami : अशी करा "गोकुळाष्टमी' साजरी 

गोकुळाष्टमी : आज मी बाजारात गेले. पाहते तर काय चोहीकडे शाडूच्या मातीच्या निळ्या-सावळ्या रंगांची मोरपीस लावून नटलेल्या कृष्णाच्या मूर्ती होत्या. जशा कृष्णाच्या अनेक लीला त्या लिलांचे हुबेहुभ रूप मूर्तीकारांनी मूर्तीमध्ये उतरवले. त्या मूर्ती पाहण्यात मी दंग झाले. लोणी खाणार, तोंडाला लोणी लागलेला. त्याच बालरुप, पेंद्याबरोबर गायीच्या मागे मुरली वाजवत निघालेला कृष्ण, कृष्णाला "गोपालकृष्ण' म्हणतात. कारण कृष्ण गायीच पालन, रक्षण करत असे. शेषावर मुरली वाजत उभा राहिलेला कृष्ण राधा-कृष्णाची जोडी उभी असलेली व शेवटी एका पाळणा होता. त्यात रांगणारा बाळकृष्ण. माझ्या पटकन लक्षात आलं. अरे येत्या सोमवारी श्री कृष्ण जन्माष्टमी आहे. त्याला "गोकुळाष्टमी' म्हणतात. श्रावण वद्य अष्टमीला रोहिणी नक्षत्र, मध्यरात्री मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत देवकीच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म झाला. 

सर्व लोक या मूर्ती घरी नेऊन भक्तीभावान पूजा करतात व रात्री बाराच्या नंतर मोठ्या धुमधडाक्‍यात कृष्णाचा जन्मकाळ साजरा करतात. श्रीकृष्ण जन्माची कथा अशी आहे. राम अवतार संपल्यावर पृथ्वीवर सर्वत्र दैत्य उन्मत्त झाले. त्यांची नावे कंस, शिशुपाल, जरासंध. ते लोकांचा खूप छळ करू लागले. यज्ञ, याग बंद पडले. पृथ्वीवर थरकाप उडाला. सर्व लोक विष्णूकडे गेले व आपले रक्षण करा, अशी विनंती केली. विष्णूनी सर्वांना सांगितलं, 
"घाबरू नका! मी मथुरेत वसुदेव, देवकी यांच्या पोटी कृष्ण म्हणून जन्म घेईन व दुष्टांचा संहार करीन' मथुरेचा राजा उग्रसेन त्याचा मुलगा कंस हा दुष्ट बुद्धीचा होता. तो आई-बापाला सुद्धा जुमानत नसे. त्यान आपल्या पित्याला म्हणजे उग्रसेनला राज्यावरून खाली उतरवले. उग्रसेनची मुलगी देवकीच लग्न वसुदेवाशी झालं. त्यांची वरात चालू असताना आकाशवाणी झाली. 
"कंसा देवकीचा आठवा पुत्र तुझा वध करेल' कंस देवकीस मारणार होता. तेवढ्यात वसुदेव म्हणाला "मला होणारे पुत्र तुला देईन'. मग कंसान दोघांना तुरुंगात टाकले. देवकीला तुरुंगात पहिला पुत्र झाला. पण कंसान लक्ष दिल नाही. तेव्हा नारदमुनीनी येऊन कळ लावली. 

"अरे कंसा तू पहिल्यापासून मोजतोसय. पण उलट मोजत गेलास तर पहिला आठवा होऊ शकतो.' कंस लगेच तुरुंगात गेला. देवकीच्या मुलाला मारले. मग प्रत्येक देवकीचा पुत्रांना मारत गेला व "बालहत्या' हे मोठ पाप केले. ब्राह्मणांचे यज्ञ उधळले. ब्राह्मण हत्या केली. कंसाचा पापघडा भरला. भगवान विष्णूनी देवकीच्या गर्भात प्रवेश केला. देवकी गर्भवती झाली. देवकीला खूप तेज आल, देवकीचे दिवस भरले तस कंस म्हणू लागला. 

"मी आता देवकीच्या आठव्या पुत्राला ठार मारीन म्हणजे माझा मृत्यू टळला' श्रावण महिन्याचा कृष्णपक्ष होता अष्टमीला मध्यरात्री देवकीच्या पोटी भगवान विष्णूनी जन्म घेतला व म्हणाले, "मला गोकुळात नेऊन ठेव' गोकुळात वसुदेवाची दुसरी बायको रोहिणी नंदा घरी होती. मध्यरात्र होती. यमुनेला महापूर आला होता. देवाची लीला अघात होती. बंदीशाळेची कुलपे गळून पडली वसूदेवाच्या पायातील बेड्याही तुटल्या. पहारेकरी गाढ झोपले. वसुदेव कृष्णाला घेऊन निघाले. यमुनेनेही वाट करून दिली. वसुदेव गोकुळात नंदाच्या वाड्यात आला. त्यावेळी यशोदा बाळंतीण होऊन तिला मुलगी झाली होती. वसुदेवान कृष्णाला तिच्या जवळ झोपवले. मुलीला घेऊन तुरुंगात आला. मुलाचा रडण्याचा आवाज ऐकून कंस धावत तुरुंगात आला. त्याने मुलीला हातात घेतल व आपटणार येवढ्यात ती आकाशात वीज लखलखत गेली व आकाशवाणी झाली. 

"अरे कंसा तुझा वैरी गोकुळात सुखरूप आहे.' गोकुळात यशोदेला मुलगा झाला म्हणून जन्म उत्सव साजरा होऊ लागला. कृष्ण गोकुळात आपल्या नाना लिलान, खोडकर वृत्तीने मोठा होऊ लागला. कृष्णाने दुष्टराजे कंस, जरासंध, नरकासुर, शिशुपाल यांना ठार मारले. अर्जुनाला भगवत गीता सांगितली. सर्व लोकांना सुखी केले. तो मनुष्य म्हणून जन्मला. पण त्याच्या कार्यान अवतारी पुरुष ठरला. त्याचे स्मरण म्हणून गोकुळाष्टमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. 

कृष्णाचा जन्मकाळ रात्री बारा वाजल्यानंतर करतात. गोकूळ, मथुरा, वृंदावन, द्वारका येथे विशेष साजरा करतात. शहरातून श्री कृष्णाची मोठी मोठी सुंदर मंदिरे बांधली आहेत. मंदिराला लाईटींग करून, फुलांनी पाळणा सजवतात. बहुसंख्येने लोक जमतात. पाळण्यात कृष्णाची मूर्ती बसवून पूजा वगैरे करून निरनिराळ्या दुधाच्या मिठायांचा नैवेद्य दाखवतात. गुजराती लोक कृष्णभक्त आहेत ते लोक सुद्धा जन्मकाळ मोठ्या प्रमाणात साजरा करतात. 

दुसरे दिवशी गोपाळकालाच पारणे असते. दहीहंडी असते. शहरातून दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करतात. भर पावसात दहीहंडी फोडण्यास मूल नाचत गाणे म्हणत असतात. असं दहीहंडी उंच बांधलेली असते वर चढून फोडतात. 

"गोविंदा आला रे आला 
मटकी सांभाल ब्रिजबाला रे' 
लहान, थोरांना, सर्वांना आनंद देणारा हा गोकुळाष्टमीचा उत्सव आहे.