
कऱ्हाड शहराला तिन्ही बाजूंनी कृष्णा-कोयना नद्यांनी वेढले आहे. त्यामुळे कऱ्हाड शहराच्या वाढीवर मर्यादा आल्या. परिणामी कऱ्हाड शहराचे छोटे उपनगर म्हणून मलकापूर उदयास आले. सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक महसूल देणारी सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून सुरुवातीच्या काळात मलकापूरची ओळख निर्माण झाली होती. त्यादरम्यान मलकापूरजवळील कोयना वसाहत परिसरात औद्योगिक वसाहत सुरू झाली.