
ऋषिराज तायडे - rushirajtayde@gmail.com
एखाद्या कामासाठी मोबाईल हाती घेतला, ते काम होत नाही तोच तुमची बोटे आपसूकच इन्स्टाग्रामकडे वळतात. मग तिथे समोर आलेले रील्स पाहता पाहता कधी अर्धा तास निघून जातो, हे अनेकांच्या लक्षात येत नाही. ही परिस्थिती सध्या अनेकांसोबत होताना दिसत आहे. अनेकांना मोबाईलचे जणू व्यसनच लागले आहे. कितीही प्रयत्न केला तरी न राहवून हात मोबाईलकडे जातोच. तुमच्याबाबतही असे होत असेल, तर काही ॲप्स तुमची ही सवय मोडू शकतात.