Human Nature And Universe : निसर्गाच्या मर्यादा विसरणाऱ्या आधुनिक माणसाची चिंताजनक वाटचाल

Relationship Between Man And Nature : ग्रह, निसर्ग आणि मानवी जीवन यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट करताना लेखक आधुनिक माणसाच्या अनैसर्गिक वर्तनावर भाष्य करतो आणि निसर्गाच्या मर्यादा ओलांडण्याचे परिणाम अधोरेखित करतो.
Human Nature And Universe

Human Nature And Universe

esakal

Updated on

आकाशातील ग्रह-तारे हे गतीशी संबंधित आहेतच. या ग्रह ताऱ्यांच्या गतीच्या अनुरोधानेच पृथ्वी गतिमान असते आणि या पृथ्वीवर चालणारा किंवा फुटपाथवर चालणारा हा तथाकथित माणूस या ग्रहमालेतील गतीशी अप्रत्यक्षपणे संबंधित आहेच. माणसाच्या काया, वाचा आणि मनाची हालचाल किंवा वाटचाल या मानवी जीवनाच्या किंवा महानगरपालिकेच्या फुटपाथवर नजर रोखून म्हणा किंवा हावभाव दाखवत बडबड करत किंवा आरडाओरड करत सतत चालूच असते. हे आपण सतत पदोपदी पाहतच आहोत.

पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांचा आधार घेत वळवळ करत भेट करणारा माणूस किती परावलंबी असतो हे कलियुगातला माणूस जाणूनच घेत नाही. असा हा सध्याच्या कलियुगातला माणूस विचित्र वागत बेभान होत, डोंगरदऱ्यातून भटकत असतो आणि सतत विचित्र फ्लॅशन्यूज देत असतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com