
HumanVsAI
sakal
गिरीश कुलकर्णी - writetogpk@gmail.com
फटफटी टुरटुरवत तो दूर आला होता. वाटेतल्या महामार्गांची समृद्धी न्याहाळताना त्याला अशक्य स्वप्ने प्रत्यक्षात आली असं सांगणारे भोळसट शहाणे भेटत होते. रस्ताभर त्या सगळ्यांना तो स्वतःचा वेगवेगळ्या नावानं परिचय देत आला होता. कुणी कुणाला ओळखू इच्छित नसताना उगाच कशाला नावा-गावाचा बडिवार?