Importance of Literature : मनाची लाखो शकलं करणाऱ्या काळात साहित्य का गरजेचं आहे?

Digital Age and Attention : तंत्रज्ञान, सोशल मीडिया आणि सततच्या माहितीच्या माऱ्यामुळे माणसाचे लक्ष अनेक दिशांना विभागले जात आहे. अशा काळात मन, विचार आणि व्यक्तिमत्त्व समजून घेण्यासाठी साहित्याची उपयुक्तता वाढत असल्याचा लेखाचा सूर आहे.
Digital Age and Attention

Digital Age and Attention

esakal

Updated on

प्रणव सखदेव

अनेक प्रश्न आहेत, पेच आहेत. पण आज सजग माणूस म्हणून ढोबळ वास्तवापलीकडे असलेली अनेक वास्तवं आणि त्यातले अनेक अत:स्तर समजून घेण्यासाठी दमछाक झाली तरी ती करावी लागेल. नाहीतर आपला वापर कोण कसा करेल हे सांगता येणार नाही.

एका कार्यक्रमानंतर तरुण मित्राने विचारलं, ‘‘चहा घ्यायला जाऊ या का? समोरच एक टपरी आहे.’’

मी तत्काळ होकार दिला. कार्यक्रमभर छान, गोड हसून गाल दुखू लागले असल्याने जरा चेंज आणि आराम दोन्ही हवं होतं. मी त्याला ओळखत नव्हतो. पण त्याने माझं लेखन बऱ्यापैकी वाचलं असल्याचं त्याच्या बोलण्यावरून मला समजलं. केवळ माझंच नाही, तर इंग्रजी, सद्यःकालीन मराठी लेखकांचंही त्याने वाचलं होतं. त्यामुळे मी जरा सुखावलो आणि चांगली चर्चा होईल असं वाटून चहा प्यायला निघालो.

त्याने प्रश्न विचारला, ‘‘सर आज म्हणजे २०२६मध्ये साहित्याची उपयुक्तता आहे का?’’

मी थोडासा विचार केला आणि म्हणालो, ‘‘आपण भांडवलशाही, उपयुक्ततावादी, सतत फायदा मोजणाऱ्या जगात राहतो हे वास्तव आहे. आणि तरीही मला वाटतं, साहित्याची उपयुक्तता येत्या काळात भरपूर असेल.’’

तो हसत म्हणाला, ‘‘नाही सर. तुमचा उपहास माझ्या लक्षात आला. पण मला उपयुक्तता हा शब्द फायदा एवढ्या एकाच मर्यादित अर्थाने नव्हता वापरायचा.’’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com